ताज्या बातम्या

अदानी समूहाचे शेअर्स 13 टक्क्यांनी घसरले,एका दिवसात 90,000 कोटींचा फटका


अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये बुधवारी (13 मार्च) जोरदार विक्री झाली. शेअर बाजारातील कमजोरी दरम्यान, अदानी समूहाचे शेअर्स आज सुमारे 13 टक्क्यांनी घसरले. समूहातील सर्व 10 कंपन्यांचे समभाग लाल रंगात व्यवहार करत होते.

त्यामुळे दुपारपर्यंत अदानी समूहाचे बाजारमूल्य सुमारे 90 हजार कोटी रुपयांनी कमी झाले होते.

सर्वात मोठी घसरण अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअर्समध्ये दिसून आली, जी इंट्राडे 13 टक्क्यांनी घसरून 1,650 रुपयांवर आली. 2024 मध्ये अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअर्समधील ही सर्वात मोठी इंट्राडे घसरण आहे.

अदानी समूहाची मुख्य कंपनी अदानी एंटरप्रायझेसचा (Adani Enterprises) समभाग सुमारे 5.5 रुपयांनी घसरला. तर अदानी पोर्ट्स (Adani Ports) 5.3 टक्क्यांनी घसरून व्यवहार करत होता. हे दोन्ही शेअर्स निफ्टी इंडेक्सचा भाग आहेत. या काळात निफ्टी निर्देशांक 200 अंकांनी किंवा 1 टक्क्यांनी घसरला होता. अदानी एंटरप्रायझेसच्या घसरणीचा हा सलग सातवा दिवस आहे.

ACC आणि अंबुजा सिमेंट या दोन्ही अदानी समूहाच्या सिमेंट कंपन्यांचे शेअर्स अनुक्रमे 4.3 टक्के आणि 2.9 टक्क्यांनी घसरले. याशिवाय अदानी एनर्जी सोल्युशन्स, अदानी पॉवर, अदानी टोटल गॅस, एनडीटीव्ही आणि अदानी विल्मार 4 ते 7 टक्क्यांच्या दरम्यान घसरले.

आजच्या घसरणीमुळे अदानी समूहाच्या एकूण बाजार भांडवलात आतापर्यंत 90,000 कोटी रुपयांची घट झाली आहे. मंगळवारी व्यापाराच्या शेवटी, अदानी समूहाचे एकूण मार्केट कॅप ₹ 15.85 लाख कोटी होते. अदानी समूहाच्या बहुतांश शेअर्समध्ये घसरणीचा हा दुसरा दिवस आहे.

व्यवहाराच्या शेवटी, अदानी एंटरप्रायझेसचे समभाग 6.81%, अदानी पोर्ट्स 6.47% आणि अदानी ग्रीन एनर्जी 8.33% ने घसरले. तर अदानी एनर्जी सोल्युशन्स 8.41%, अदानी पॉवर 5%, अदानी विल्मर 4.06% आणि अदानी टोटल गॅस 9.14% ने घसरले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *