पाटण : सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यानाच मुख्यमंत्री बनन्याचा अधिकार आहे आणि शेतकऱ्यांच्या मुलाला मुख्यमंत्री होण्याचा अधिकार नाही का असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला.
घरात बसून उंटावरून शेळ्या राखणारा मी मुख्यमंत्री नाही तर लोकात जाऊन काम करणारा मुख्यमंत्री आहे, असा टोलाही त्यांनी ठाकरे यांना लगावला. राज्याचा चिफ मिनिस्टर म्हणजे मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर कॉमन मॅन म्हूणन काम करत आहेअसे ते यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन व पाटण तालुक्यातील आठ गावांमधील दरडग्रस्त कुटुंबांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या पुनर्वसन प्रकल्पाचे शिद्रुकवाडी (धावडे) येथे भूमिपूजन झाले. त्यापसंगी ते बोलत होते.
सातारा जिल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, उदयोग मंत्री उदय सामंत, मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई, यशराज देसाई, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अतरीरिक्त पोलीस अधीक्षक आचल दलाल, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, स्थानिक पदाधिकारी-कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.