“जरांगे पाटलांमुळे महिलांवर शाब्दिक ब’ला’त्का’र होताहेत,”जरांगेंचा अजूनही इतका अट्टाहास का ? – वानखेडे
पुणे : सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मराठा समाजाला राज्य सरकारने १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. परंतु मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील अजूनही आंदोलनावर ठाम आहेत. यातच अधिसुचनेची अंमलबजावणी करावी, यासाठी जरांगेंनी २४ फेब्रवारीपासून आंदोलनाची हाक दिलीय.
यातच जरांगेंचे एकेकाळचे सहकारी अजय महाराज बारसकर यांनी पत्रकार परिषद घेऊन जरांगेंवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे राज्यात एकच चर्चा सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला आता पुण्यातून सामाजिक कार्यकर्त्या आणि मराठा आरक्षणासाठी काम करणाऱ्या महिला यांनी देखील जरांगेंवर गंभीर आरोप केले आहेत.
आमच्या ताटातलं आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे,अशी आमची आग्रहाची मागणी आहे. परंतु तो जरांगे पाटील दुसऱ्याच्या ताटातलं खाण्याचा प्रयत्न करतोय. मराठ्यांना दहा टक्के आरक्षण दिलंय, मग जरांगेंचा अजूनही इतका अट्टाहास का ? असा सवाल वानखेडे यांनी उपस्थित केलाय. तर बारसकर महाराज यांनी जरांगे पाटलाचं सगळं सांगितलं आहे. त्यादिवशी आंदोलन करायचं नव्हत. आधी मिटींग करायची होती. हा मीडियासमोर गेला अन् थेट उपोषणाला बसल्याचं घोषीत केलं. परंतु त्याच्या अगोदर कुणाचा तरी फोन आला होता. ? तो फोन कुणाचा होता, तो चेक करा ना. अशी मागणी देखील त्यांनी केलीय.
हा मराठ्यांचा तुणतुण नाही तर वेगळंच कुणाचं तरी तुणतुणं असून तो कुणाच्या बोलण्यावरून करत आहे. ते समोर आलं पाहिजे. राज्यात मनोज जरांगे पाटलांमुळे मराठ्यांच्या महिलांचे शाब्दिक बलात्कार होताहेत. किती लोक महिलांना ट्रोल केलं जात आहे. सगळ्यांना बोला पण महिलांना बोलू नका. हे असं का बोलत नाही. महिलांबाबत याच्या बाईटमध्ये शब्दच नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या सांगण्यावरून महिलांना ट्रोल केलं जातंय. असा आरोप देखील केला जात आहे. त्यांच्यासोबत काही लोकं काम करत होते. त्यात अजय बारसकर एक होतं. बारसकर यांना त्रास दिला जात होता. असेही त्या म्हणाल्या.
अंतरवाली सराटीत त्याची मुलगी चक्कर येऊन पडली होती. तेव्हा जरांगे पाटील इतरांना दणादण लोकांना ढकलत होता. मग माझं लेकरं माझा समाज हे काय ? तसेच त्याच्यासोबत इतर लोकं सेल्फी काढण्यासाठी येतात. तेव्हा तो त्या लोकांना ढकलून देतो. त्याला फक्त समाजाने मोठं केलं. इतका माज कुठून आलाय. असा सवाल देखील त्यांनी केलाय.