मुंबई : महाराष्ट्र बैलगाडा शर्यत असोसीएशनचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांचा 21 फेब्रुवारीला मृत्यू झाला. ज्यानंतर ते सोशल मीडियावर दुपारपासून ट्रेंड होऊ लागले. पंढरीनाथ फडके यांची गाणीची सर्वत्र लोक ऐकू लागले ज्याचे काही वेळातच व्ह्यूज वाढले.
ते कोण आहेत? काय करतात? हे जाणून घेण्याची लोकांमध्ये इच्छा वाढली. तसेच त्यांचा मृत्यू का झाला याची देखील चर्चा होऊ लागली.
बैलगाडा शर्यतीसाठी कोर्ट आणि इतर शासकीय दरबारी फडके यांनी नेहमीच पुढाकार घेतला होता. ज्यामुळे त्यांच्या या अशा जाण्याने असोशियएशनची मोठी हानी झाली असल्याची भावना लोकांच्या मनामध्ये आहे.
त्यांच्या मृत्यूनंतर अशा अनेक अफवा उठल्या की त्यांना HIV झाला होता. तर काही म्हणत होते, त्यांना हार्टअटॅक आला. तर काहिंनी म्हंटलं की त्यांना कॅन्सर होता, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, पण खरं कारण कोणालाच माहित नव्हतं. पण आता पंढरीनाथ फडके यांचा मृत्यू का आणि कसा झाला हे समोर आलं आहे.
पंढरीनाथ फडके यांचा मृत्यू हृदयविकारामुळे झाला. खरंतर त्यांना मधुमेह होता, यावर बऱ्याच वर्षांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. अशातच कल्याणमध्ये राहुल पाटील यांच्यावर गोळीबार प्रकरणात त्यांना अटक झाली होती. त्यामुळे त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती.
तुरुंगात गेल्यामुळे पंढरीनाथ फडके यांची प्रकृती खालावली होती. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र तरीही ते आपल्या ऑडी कारने बैलगाडा शर्यतीत सहभागी होत होते. अलीकडेच मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ढासळली होती. त्यांना चालणंही कठीण झालं होतं. आज सकाळी राहत्या घरी त्यांना ह्रदयविकाराच्या तीव्र धक्का बसला, त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.