देशातील असंख्य हिंदूंसह सर्वधार्मियांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे, शिवसेनेचे संस्थापक, हिंदू हृदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांना भारत रत्न देण्याची मागणी राष्ट्रीय मराठी मोर्चा चे संस्थापक अध्यक्ष आनंद रेखी यांनी रविवारी केली.लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना यासंदर्भात ‘राममो’च्या वतीने निवेदन देऊ, असे माहिती रेखी यांनी दिली.
शिवसेना स्थापन करून महाराष्ट्रासह देशभरातील मराठी बांधवांचा स्वाभिमान जागवण्याचे काम स्व.बाळासाहेबांनी केले. मराठी नागरिकांना राजकीय नेतृत्व देण्याचे तसंच हिंदू भावना तेवत ठेवण्याचे कार्य ठाकरे यांनी त्यांच्या अस्सल नेतृत्वातून केले.मुंबईतील गुंडाराज विरोधात खंबीरपणे उभं राहण्याचे काम ठाकरेंनी केले.हिंदू-मुस्लिम असा भेद न करता ‘हिंदुत्व’ ची नवं संकल्पना त्यांनी मांडली.
बाळासाहेबांनी त्यांचा नेतृत्वाची भुरळ सर्वच राजकीय नेत्यांवर पाडली होती.बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्याची यादी मोठी आहे.राजकीय आणि वैचारिक मतभेद असले तरी त्यांनी मनभेद ठेवले नाहीत. महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या जडनघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे.अशात स्व.बाळासाहेबांना भारत रत्न द्यावा, अशी आग्रही मागणी आनंद रेखी यांनी केली.