ताज्या बातम्या

ब्राह्मणांना आरक्षण नाही हे परमेश्वराचे खूप मोठे उपकार; नितीन गडकरींचे वक्तव्य


राज्यात आरक्षणाचा मुद्दा तापला आहे अशातच केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ब्राह्मणांना कुठलही आरक्षण नाही हे परमेश्वराचे खूप मोठे उपकार असल्याचे गडकरी म्हणाले.

पार्ल्याच्या लोकमान्य सेवा संघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात गडकरी यांची विशेष मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले.

आरक्षण नसल्यामुळे ब्राह्मण समाज व्यवसायाकडे वळला असल्याचे त्यांनी पुढे म्हटले आहे.

परमेश्वराने ब्राह्मणांवर खूप मोठ उपकार केले आहेत की कुठल्याही प्रकारचे आरक्षण नाही. त्याच्यामुळे लोक वडापाचे दुकाणे टाकत आहेत. व्यवसायाकडे वळत आहेत. समस्या असतात काही समस्या शासकीय, व्यवसायिक असतात. काही आर्थिक असतात. पण तुमच्या मनातील इच्छाशक्ती मजबूच असेल तर पैशांच्या अडचणी कदीच येत नाहीत.

जात, पंथ, धर्म, भाषा बाजूला ठेवून सामाजिक, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना आरक्षण द्यावे, असं वक्तव्य देखील नितीन गडकरी यांनी केलं आहे.

राज्यात मराठा आरक्षणाचा विषय तापला आहे. मनोज जरांगे आरक्षणासाठी राज्यभर सभा घेत आहे. त्यांवी सरकारला २० जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे. तर ओबीसी, धनगर समाज देखील मैदानात उतरला आहे.

नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक,200 तरुण-तरुणी इंटरव्ह्युला आले,ऑफर लेटरही मिळाले, सकाळी ऑफिस गायब!


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *