ताज्या बातम्या

शहादू शिवाजी वाघ स्मृती राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धा..


शहादू शिवाजी वाघ स्मृती राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धा..

शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान, पिंपळगाव जलाल ता येवला जि नाशिक आयोजित शहादू शिवाजी वाघ यांच्या तिसऱ्या स्मृती साहित्य कलाकृती पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने  राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. राज्यभरातील जास्तीत जास्त कवींनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा संजय शहादू वाघ यांनी केले आहे

स्पर्धेचे नियम व अटी पुढील प्रमाणे
निवेदन काळजीपूर्वक वाचावे.

१. काव्यलेखन स्पर्धेची नाव नोंदणी दि. १५ जानेवारी २०२४ पर्यंत sswpunyasmaran2023@gmail.com या ईमेल वर पुर्ण नाव व पत्ता असलेली फक्त एकच कविता पाठवून नोंदणी करावी.

२. वेळेच्या नंतर आलेल्या कविता ग्राह्य धरल्या जाणार नाही. ईमेल प्राप्त झाल्यावर संबंधित कवीला कळविण्यात येईल.

३. नोंदणीसाठी कविता टेक्स्ट मेसेज स्वरूपात पाठवावी. पीडीएफ, जेपीजी, अथवा फोटो टाईपमध्ये, अथवा कागदाच्या पानावर लिहून तो कागद पाठवू नये

४. कविता एकदा पाठवल्यास दुरूस्ती करून पुन्हा पाठवू नये अथवा दोन कविता पाठवू नये असे केल्यास त्या स्पर्धकाला संधी दिली जाणार नाही, नंबर बाद केला जाईल.

५. कविता जास्तीत जास्त २० ओळींची असावी.

६. सामाजिक, नैसर्गिक, कौटुंबिक, आई-बाप अशा आशयाच्या कविता स्वागतार्ह आहेत. जातीयवादी, राजकीय विडंबन, व्यक्ती चारित्र्यहनन करणा-या कविता बाद केल्या जातील.

७. काव्यलेखन स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

८. प्राप्त ईमेलच्या वेळेनुसार कवितांचा अनुक्रम लावण्यात येईल. आणि त्याला सांकेतिक क्रमांक दिला जाईल.

९. स्पर्धेसाठी आलेल्या सर्व कविता परीक्षकांना देतांना कवीचे नाव दिले जाणार नाही त्याऐवजी सांकेतिक नंबर दिला जाईल, हा नंबर फक्त संयोजकांकडे असेल. तसेच परीक्षकाचे नाव निकालापूर्वी जाहीर केले जाणार नाही.

१०. काव्यलेखन स्पर्धेचा निकाल *दि १५ मे – २०२४* पर्यंत जाहीर केला जाईल, याबाबत कोणतीही वारंवार विचारणा करू नये.

११. काव्यलेखन स्पर्धेतील पुरस्कारप्राप्त कवींनी प्रत्यक्ष हजर राहून पुरस्कार स्वीकारावा लागेल, पोस्टाने पाठविला जाणार नाही याची नोंद घ्यावी. कवींनी भाग घेतांना या सूचनेचा विचार करूनच भाग घ्यावा.

१२. पुरस्कार वितरण सोहळ्यास पुरस्कारप्राप्त कवींना आमंत्रित केले जाईल तथापि, इतर सहभागी कवींना येणे शक्य असल्यास त्यांचे स्वागत असेल त्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व मानपत्र प्रदान करण्यात येईल.

१३. पुरस्कार वितरण सोहळ्यास येणा-या कोणत्याही कवीला प्रवास खर्च दिला जाणार नाही. स्वखर्चाने यावे लागेल. मात्र येणाऱ्या प्रत्येक साहित्यिकाला चहा नाष्टा व जेवणाची व राहण्याची व्यवस्था केली जाईल.

१४. काव्यलेखन स्पर्धेचे पुरस्कार वितरण दि. ४ जून २०२४ रोजी कार्यक्रम स्थळी केले जाईल. कार्यक्रमाचे स्थळ आणि वेळ नंतर कळविण्यात येईल

🏆 पुरस्काराचे स्वरूप
काव्यलेखन स्पर्धेचे क्रमांक व पुरस्कार पुढीलप्रमाणे असतील
🥇 प्रथम (एक) रु. १००१/- + सन्मानचिन्ह + मानपत्र
🥈 व्दितीय (एक) रु. ७५१/- + सन्मानचिन्ह + मानपत्र
🥉 तृतीय- (एक) रु. ५५१/- + सन्मानचिन्ह + मानपत्र
🎖️ उत्तेजनार्थ (दोन) – प्रत्येकी २५१/- + सन्मानचिन्ह + मानपत्र

१५. परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

१६. शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारणी करत नाही याची नोंद घ्यावी.

आपले स्नेहांकित – शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान,
पिंपळगाव जलाल, ता. येवला, जि. नाशिक
मार्गदर्शक, अध्यक्ष, संपादक, सचिव, मानद सचिव व सर्व सदस्य
संपर्क आणि अधिक माहितीसाठी – संपादक, शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान – प्रशांत वाघ- ७७७३९२५०००

एक्स्पायर्ड कंडोमपासून ड्रेस बनवला, जागरुकतेसाठी फॅशन डिझायनरचा अनोखा प्रयोग, VIDEO पहाच


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *