संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या सोमवारी कामकाज सुरू होताच विरोधी पक्षातील खासदारांनी संसदेच्या सुरक्षेबाबत गोंधळ घातला. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
त्यामुळे लोकसभेतील १३ तर राज्यसभेतील एका खासदाराला निलंबित करण्यात आलं होतं. यात आज देखील यावरून विरोधकांनी सभागृह दणाणून सोडला. त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभा मिळून असे एकूण ९२ खासदारांवर निलंबणाची कारवाई करण्यात आलीय. ही संसदेच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई मानली जाते.
संसद सुरक्षाविषयी चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी मागील दोन ते तीन दिवसापासून लावून धरली आहे. परंतु त्यावर लोकसभा अध्यक्ष चर्चा करण्यास नकार देत आहेत. यामुळे लोकसभेचं कामकाज सुरू होण्याच्या आधीच खासदारांनी सभागृहात गोंधळ घातलाय. यामुळे एका दिवसात ७८ खासदार निलंबित करण्यात आले आहेत. तर आतापर्यंत ९२ खासदार संसदेच्या हिवाळी अधिवेशनातून निलंबित झाले आहेत. यामध्ये लोकसभेत ४६ तर राज्यसभेत ४६ खासदारांचा समावेश आहे.
दरम्यान, राज्यसभेतील ३४ विरोधी पक्षांच्या खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. सभापतींचे आदेश न पाळल्यामुळे या खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. यामध्ये प्रमोद तिवारी, जयराम रमेश, अमी याज्ञिक, नारायण भाई राठवा, शक्ती सिंह गोहिल, रजनी पाटील, सुखेंदू शेखर, नदीमुल हक, एन. षणमुगम, नसीर हुसेन, फुलोदेवी नेताम, इम्रान प्रतापगढ़ी, रणदीप सुरजेवाला, मौसम नूर, समीरूल इस्माम, रणजीत रंजन, कनिमोझी, फैयाज अमजद, मनोज झा, रामनाथ ठाकूर, अनिल हेडगे, वंदना चव्हाण, रामगोपाल यादव, जावेद अली खान, जोसे मनसे, जोशी. महुआ मांझी आणि अजित कुमार यांचा समावेश आहे.