Navgan News

ताज्या बातम्या

ठिकाण राजभवन – ही बाई कोण आहे? राज्यपालांच्या खुर्चीला मान सन्मान आहे की नाही? -मनसे नेते मनोज चव्हाण


राजभवनातले या मॉडेलचे फोटो समोर आले आहेत. त्यावरून मनसेने आक्षेप घेतला आहे. मायरा मिश्रा या मॉडेलने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली.
यावेळी तिने कोश्यारी यांच्यासह खुर्चीसोबत आणि राजभवनात इतर ठिकाणी फोटो काढले. हे फोटो तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. यावरुन मनसेने राज्यपालांना खडे बोल सुनावले.

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वादांवरून (Controversy) चर्चेत आहेत. सततच्या वक्तव्यांवरून विरोधी पक्षांसह लोकांनी त्यांच्या विषयी संताप व्यक्त केला. मात्र, आता कारण वेगळे आहे. कोश्यारी एक मॉडेलमुळे (Model) पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राजभवनातले (Raj Bhavan)या मॉडेलचे फोटो समोर आले आहेत. त्यावरून मनसेने आक्षेप घेतला आहे. मायरा मिश्रा (Maera Mishra) या मॉडेलने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी तिने कोश्यारी यांच्यासह खुर्चीसोबत आणि राजभवनात इतर ठिकाणी फोटो काढले. हे फोटो तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. यावरुन मनसेने राज्यपालांना खडे बोल सुनावले.
मनसे नेते मनोज चव्हाण (MNS Manoj Chavan) यांनी याविषयी ट्वीट केले आहे. आपल्या ट्वीटसोबत त्यांनी मायरा मिश्राचा फोटो शेअर केला आहे. या ट्वीटमध्ये चव्हाण म्हणतात, ठिकाण राजभवन – ही बाई कोण आहे? अभिनेत्री आणि मॉडेल राजभवनात काय करतेय? राज्यपालांच्या खुर्चीला मान सन्मान आहे की नाही? या ट्वीटनंतर आता नवा वाद निर्माण झाला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *