Navgan News

ताज्या बातम्या

औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांच्या नामांतराचा प्रश्न निकाली, निषेध करत 240 काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे राजीनामे


ठाकरे सरकारने शेवटच्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांच्या नामांतराचा प्रश्न निकाली लावला.

औरंगाबादचं संभाजीनगर (Aurangabad Sambhajinagar) आणि उस्मानाबादचं धाराशिव (Osmanabad Dharashiv) असं नाव बदलण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. शिवसेनेच्या अनेक वर्षांपासूनच्या अजेंड्यावरचे हे प्रस्ताव मार्गी लागल्यामुळे एकीकडे शिवसेनेत आनंदाचं वातावरण आहे तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीचं चित्र आहे. ठाकरे सरकारची शेवटची कॅबिनेट बैठक म्हणून महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी प्रत्यक्ष बैठकीच्या वेळी या निर्णयाला विरोध केला नाही तरीही स्थानिक नेत्यांमधील नाराजी अधिक तीव्रतेने बाहेर पडतेय. औरंगाबादेत काल या निर्णयाचा निषेध करत 200 काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले तर आज उस्मनाबादेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 40 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *