कधी होणार तिसरं महायुद्ध? ब्रिटिश अधिकाऱ्यांनी युद्ध सुरू झाल्यास नागरिकांना नेमकं काय साठा करणं आवश्यक आहे हे सांगण्यासाठी एक वेबसाइट सुरू केली

बाबा वेंगा असो वा नास्त्रेदामस यांनी बऱ्याच भविष्यवाणी वर्तवल्या, त्यापैकी काही खऱ्यासुद्धा ठरल्या. 2024 सालाबाबतही त्यांनी काही भविष्यवाणी वर्तवल्या त्यासुद्धा खऱ्या ठरत असल्यासारख्याच दिसत आहेत.
अशात आता एका भारतीय ज्योतिषानेही एक भविष्यवाणी केली आहे. जूनमध्ये घडणाऱ्या घटनेबाबतची भविष्यवाणी त्याने वर्तवली आहे, ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
कुशर कुमार असं या भारतीय ज्योतिषाचं नाव आहे. त्याने सोशल मीडिया लिंक्डइनवर एक पोस्ट शेअर केली आहे. पंचकुलात राहणा त्याच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, कुमार हे वैदिक ज्योतिषी आहेत. जे भविष्यातील घडामोडींचे अंदाज बांधण्यासाठी ग्रहांची स्थिती दर्शविणारे तक्ते वापरतात. पंचकुलाचे रहिवासी असलेले कुशल कुमार जागतिक घटनांचे भाकीत करतात. त्यामुळे त्यांनी नुकतीच केलेली एक भविष्यवाणी सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.
काय आहे भविष्यवाणी?
कुशर कुमार यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये जूनमध्ये घडणाऱ्या भयंकर घटनेचा उल्लेख केला आहे, ते म्हणजे तिसरं महायुद्ध. ते म्हणाले की, ‘2024 सालात जगभरातील हॉटस्पॉट्समधील युद्ध परिस्थितीच्या संदर्भात चिंतेचा विषय असल्याचं भाकीत केलं होतं. विशेषत: 8 मे च्या आसपास कोरिया, चीन-तैवान, मध्य पूर्व यांसारख्या युद्ध आघाडीवर सर्वात मोठी वाढ दर्शविली गेली. ज्यामध्ये इस्रायल आणि मध्य पूर्व, युक्रेन-रशिया इ. या घटनांमुळे नाटोही आक्रमक होऊ शकतं’
कुशल कुमार यांनी पोस्टमध्ये पुढे म्हटलं आहे की ‘काही देशांवर राज्य करणाऱ्या लोकांसाठी मोठ्या चिंतेच्या उदयोन्मुख परिस्थितीला सामोरं जाणं कठीण होऊ शकतं. काहींची तब्येत गंभीर होण्याची शक्यता आहे किंवा ते राजीनामा देऊ शकतात. राजकीय वातावरणात गोंधळाची शक्यता नाकारता येत नाही. थोडक्यात समकालीन ग्रहांच्या हालचालींवरून असं सूचित होतं की जिथं नेता कमकुवत आहे तिथं सैन्य पूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी पाऊल टाकू शकतं.
कधी होणार तिसरं महायुद्ध?
बाबा वेंगा आणि नास्त्रेदमस यांनीही 2024 सालात तिसऱ्या महायुद्धाबाबत भविष्यवाणी केली होती. कुशल कुमार यांनी याची तारीखच सांगितली आहे. कुशल कुमार म्हणाले, ‘ ग्रहमानानुसार मंगळवार, 18 जून 2024 हा दिवस तिसऱ्या महायुद्धाला कारणीभूत ठरू शकतो. 10 आणि 29 जूनचंही यात योगदान असू शकतं.
ब्रिटिश अधिकाऱ्यांनी युद्ध सुरू झाल्यास नागरिकांना नेमकं काय साठा करणं आवश्यक आहे हे सांगण्यासाठी एक वेबसाइट सुरू केल्यानंतर काही दिवसांनी हा दावा आला आहे.