आगळे - वेगळेपुणे

पोपट परत करावा, या मागणीवर पती अडून बसला घटस्फोट थांबला अन..


पुणे : घटस्फोटाचे अनेक प्रकरणे कौटुंबिक न्यायालयात दाखल होत असतात. कधी कधी घटस्फोटाचे कारण क्षुल्लक असते, तर कधी कधी अतिशय छोट्या छोट्या बाबींसाठी घटस्फोट मंजूर होत नसतो. मात्र, पुण्यातील एक अजब-गजब प्रकरण समोर आलं आहे.
पोपट दिला तरच तुला घटस्फोट देईन, असं पत्नीने सांगितलं. कौटुंबिक न्यायालयात या घटस्फोटाची सध्या वेगळी चर्चा सुरू आहे.

वकील भाग्यश्री सुभाष गुजर यांनी सदर प्रकरणात पतीची कायदेशीर बाजू हाताळली

त्यांनी या आगळ्या-वेगळ्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, पतीने पत्नीला लग्नापूर्वी आफ्रिकन ग्रे जातीचा पोपट भेट दिला होता. लग्नानंतर काही वर्षांतच दोघांमध्ये वाद निर्माण झाला. अनेक काळापासून दोघांचे पटत नव्हते. त्यामुळे त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता.

वकील भाग्यश्री पुढे म्हणाल्या, ११ डिसेंबर २०१९ रोजी पुण्यातील रजिस्ट्रार कार्यालयात दोघांनीही नोंदणी पद्धतीने लग्न केले होते. मात्र सप्टेंबर २०२१ रोजी लग्नाच्या दोन वर्षांनंतर त्यांच्यात मतभेद होऊन खटके उडू लागले. अखेर पत्नीने विभक्त होण्यासाठी डिसेंबर २०२२ रोजी घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. यानंतर हे प्रकरण समुपदेशनासाठी पाठिवण्यात आले, तेव्हा एक धक्कादायक बाब समोर आली.
दोघंही एकमेकांसह यापुढे एकत्र राहण्यासाठी इच्छुक नसल्याचे लक्षात आल्यानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय झाला.

पती आणि पत्नी त्यासाठी तयारही होते. पत्नीने पोटगीची मागणी न केल्यामुळे दोघांच्या संमतीने घटस्फोट होईल असे वाटत असतानाच, लग्नापूर्वी आपण भेट दिलेला आफ्रिकन ग्रे पोपट परत करावा, या मागणीवर पती अडून बसला. तर पत्नी पोपट द्यायला तयार नव्हती. पुन्हा समुपदेशन केल्यानंतर पत्नीने पोपट परत करण्याचे मान्य केले आणि त्यानंतर घटस्फोट मंजूर झाला .

 

रुग्णालयांमध्ये जागा मिळणार नाही; कोरोनाच्या JN.1 व्हेरिएंटबाबत गंभीर इशारा


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *