नवगण विश्लेषण

Miracle : पुलाचे वेगळेच रहस्य, कुत्रे करतात आत्महत्या, कारणाचा शोध अजूनही सुरूच !


Miracle : जगभरात अनेक रहस्यमय जागा आहेत, ज्या कोणाला सुद्धा माहित नाही. आज आम्ही तुम्हाला जगातील अश्या एका पुलाबद्ल सांगणार आहोत तिथे कुत्र्यांनी आत्महत्या केली आहे.

 

त्या पुलावर जाऊन कुत्रे का आत्महत्या करत आहेत याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. दिसायला सामान्य असलेल्या पुलावर जाऊन आतापर्यंत अनेक कुत्र्यांनी आत्महत्या केली आहे. दिसायला साधी असलेली प्रत्येक वस्तू ही कधीच साधी नसते. त्या ठिकाणांवर काहीतरी गूढ रहस्य दडलेली असतात.

 

स्कॉटलंडचा ओव्हरटाउन ब्रिज एका वेगळ्याच कारणामुळे सगळीकडे प्रसिद्ध झाला आहे. या पुलावरून आत्तापर्यंत अनेक कुत्र्यांनी आत्महत्या केली आहे. कुत्र्यांच्या आत्महत्ये मागचं कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. हा पूल 1895 मध्ये बांधण्यात आला होता. 15 मीटरचा गॉथिक शैलीचा आणि खडबडीत अशलर दगडांनी तयार करण्यात आलेला पूल दिसायला अगदी साधा आहे. या पुलावर तीन कमानी आहेत ज्या एका उंच दरीच्या दोन्ही बाजूना जोडतात. हा पूल सुंदर समुद्रकिनारा नैसर्गिक झाडे आणि वनस्पतींच्या सौंदर्यासाठी सुद्धा ओळखला जातो. मात्र कुत्र्यांनी केलेले आत्महत्यामुळे सगळीकडे हा पूल वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आला आहे.

 

1859 साली ओव्हरटाउन फार्म स्कॉटिश उद्योगपती जेम्स व्हाईट यांनी खरेदी केला. त्यानंतर लगेच 1884 मध्ये व्हाईट यांचा मृत्यू झाला. त्यानंतर या पुलाचा वारसा हक्क त्यांच्या व्हाईट यांच्या मुलाकडे गेला. पूल तयार केल्यानंतर 600 पेक्षा जास्त हुन अधिक आत्महत्या झाल्या आहेत. तर यामध्ये 50 पेक्षा जास्त कुत्रे आहेत. कुत्र्यांनी केलेल्या आत्महत्यानंतर अनेक दावे करण्यात आले होते. पण हा पूल कोणत्याही अलौकिक शक्तीने किंवा भुताने पछाडलेला नाही, हे स्पष्ट झाले. पण कुत्र्यांनी केलेल्या आत्महत्ये मागे एक कारण आहे ते म्हणजे पुलाच्या आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या मिंकचा वास. या वासामुळे कुत्रे दरीत उडी मारतात. कुत्र्यांच्या आत्महत्येमागील दुसरे कारण म्हणजे कुत्रे काही प्रकारच्या अदृश्य शक्तींना घाबरतात.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *