Manoj Jarange Patilमराठा आरक्षण

Manoj Jarange Patil: सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर मनोज जरांगे पाटील का संतापले?


छत्रपती संभाजीनगर :  Manoj Jarange Patil मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण सुरू केलं आहे. 13 जुलै रोजी सरकारला दिलेली मुदत संपूनही मागण्या मान्य होत नाहीत त्यामुळे जरांगे पाटील आज पासून पाचव्या टप्प्यातील उपोषण करीत आहेत.

सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर विधानसभेत काय निर्णय घ्यायचा याबद्दल समाजाची बैठक सुद्धा ते घेणार आहेत. आज 288 उमेदवार पाडायचे की मराठा आणि इतर समाजाचे 288 उमेदवार उभे करायचे याबद्दलचा महत्वपूर्ण निर्णय या बैठकीमध्ये होणार आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारच्या लाडकी बहीण आणि लाडका भाऊ या योजनांवर संताप व्यक्त केला.

राज्य सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर लाडका भाऊ अशीही योजना आणली. यावर मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, लाडका भाऊ लाडकी बहीण जाहीर करून आरक्षणाच्या मागणी पासून आम्हाला तुम्हाला हटवू शकत नाही. आज लाडकी बहीण, लाडका भाऊ योजना आणलीय उद्या लाडकी मेहुणी योजना येईल. लाडकी बहीण योजनेसाठी लोकांची गर्दी झाली. त्यामुळे विद्यालयांचे सर्व्हर जाम झाले. त्यांना फॉर्म भऱता आले नाहीत.

महाराष्ट्र दौऱ्याबाबत मनोज जरांगे म्हणाले की, आता 17 दिवस माझ्या हातात आहेत. 7 तारखेला पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आहे. मी जगलो तर पुढचा दौरा करेन. मी अब्युलन्स मध्ये बसून दौरा करेन. पण मी दौरा करणार म्हणजे दौरा करणारच अशी ठाम भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली.

कुणबी प्रमाण पत्र असूनही पोलीस भरती मध्ये मराठा पोरांना ओपन मध्ये जा असे सांगितले जाते. Ews सरकारने बंद केले आहे, माझ्यामुळे नाही. त्यामुळे ews सुरू ठेवावे असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं. मुलींच्या मोफत शिक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, मुलींना मोफत शिक्षण दिले पण मोफत मिळत नाही. अनेक अटी शर्ती लावल्या आहेत. त्यामुळे मोफत शिक्षण असूनही ते मिळत नाही.

मराठा आरक्षणासाठी लढा सुरू केलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला अंतरवालीत येऊ नये असं सांगितलंय. ते म्हणाले की, मराठ्यांनी इकडे येऊ नये. आता शक्ती दाखवायची गरज नाही. आपापले कामे पूर्ण करा. मी लढायला खंबीर आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *