महाराष्ट्रराजकीय

महाविकास आघाडीचे जागावाटप फायनल,शिवसेना ठाकरे गट हा 23 जागा लढवणार


राज्यातील महाविकास आघाडीचे जागावाटप फायनल झाले असून, त्यात शिवसेना ठाकरे गट हा 23 जागा लढवणार आहे. यात शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जागा निश्चित आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी पण आमच्याकडे सक्षम उमेदवार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडे उमेदवार नसल्यास आणि त्यांनी संधी दिल्यास तीदेखील लढवू, असं सांगून खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची धडधड वाढवून दिली. (Lok Sabha Elections 2024)

तसेच सरकारमध्ये अस्वस्थ वाटत असेल, तर मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारमधून बाहेर पडावे, असा सल्ला संजय राऊत यांनी मंत्री भुजबळ यांना सल्ला दिला. संजय राऊत यांच्या उपस्थित रविवारी नगरमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यापूर्वी त्यांनी आयोजित पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी राज्यासह देशभरात महाविकास आघाडी ‘इंडिया’साठी उत्तम वातावरण आहे. महाराष्ट्रातदेखील महाविकास आघाडी आणि’इंडिया’ आघाडीला यश मिळेल, असे सांगून नगरमधील गुंडगिरीवर हल्लाबोल चढवला.

“मुख्यमंत्र्यांच्या मराठा आरक्षणाच्या भूमिकेवरून छगन भुजबळ अस्वस्थ झाले असतील तर त्यांनी राजीनामा देऊन सरकारमधून बाहेर पडावे. ते पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत. त्यांनी स्वाभिमान दाखवावा. मराठा आरक्षणासंदर्भातील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेविरुद्ध दहा मंत्री दहातोंडाने बोलत आहेत. मराठा समाजातील अनेक जण आरक्षणाच्या अध्यादेशावरून तोंडाला पाने पुसली. फसवणूक झाल्याची भाषा बोलत आहेत. परंतु हे मनोज जरांगे-पाटील यांनी बोलणे आवश्यक आहे. त्यांचे समाधान झाले असेल तर आमचे काही म्हणणे नाही,” असेही राऊत यांनी म्हटले.

“महाविकास आघाडी इंडियामध्ये राज्यातील जागावाटप फायनल झाले आहे. ठाकरे गट राज्यात 23 जागा लढणार आहे. तसे निश्चित झाले आहे. पूर्वी आम्ही तेवढ्याच जागा लढत होतो. आताही तेवढ्यात जागा लढवणार आहोत. नगर जिल्ह्यातील शिर्डीही आमचीच जागा आहे. संधी मिळाल्यास नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी जागा लढवण्यास आम्ही इच्छुक आहोत. तसा सक्षम उमेदवार आमच्याकडे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने तशी संधी दिल्यास आमची तयारी आहे,” असेही राऊत म्हणाले.

महाविकास आघाडी व ‘इंडिया’ आघाडीतून तृणमल काँग्रेस आणि आम आदमी पक्ष बाहेर पडणार असल्याची चर्चा आहे, यावर राऊत म्हणाले, ‘इंडिया’आघाडी भक्कम आहे. कोणीही आघाडीतून बाहेर जात नाही. दिल्लीत आप आणि काँग्रेस एकत्रच आहेत. पंजाबमध्ये थोडी वेगळी परिस्थिती आहे, तशीच परिस्थिती पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये आहे.

महाराष्ट्रातही महाविकास आघाडी मजबूत आहे. कोणतेही मतभेद नाहीत. ‘वंचित’कडून प्रकाश आंबेडकरही चर्चेत सहभागी होत आहेत. जी काही त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर जिरवाजिरवी करायची आहे ती, निवडणुकीनंतर पुढील काळात करावी. सध्या भाजपला पराभूत करण्यासाठी एकत्र येणे आवश्यक आहे, असेही मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *