ताज्या बातम्याधार्मिकबीड जिल्हाबीड शहर

बीड मोठ्या उत्साहात संक्रात साजरी, मकरसंक्राती जाणून घेवूया थोडेसे !


बीड: मकरसंक्रात म्हटलं सौभाग्याचं लेणं लेऊन साजरा केला जाणारा सण…आपापसात गोडवा निर्माण व्हावा म्हणून महिला तीळगूळ वाटून मकरसंक्रात साजरी करतात.

मकर संक्रात हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. या दिवसी सूर्य हा धनू राशीतून शनिचा पुत्र मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून या दिवसानंतर दिवस हा मोठा आणि रात्री ही लहान होते.नववर्षातला पहिला सण मोठ्या उत्साहने साजरा केला जातो. धार्मिक द्रृष्टीने हा दिवस अतंत्य शुभ माणला जातो. या दिवसी नववधू-वरांला विशेष महत्त्व दिले जाते.

गावोगाव या दिवसी मोठमोठ्या जत्रा असतात.या सणाला विशेष म्हणजे तीळ आणि शेंगदाण्याचे लाडू केले जाते.हे पदार्थ शरिरात उष्णता निर्माण करतात. तीळाचे लाडू प्रसाद म्हणून नातेवाईकांना, शेजाऱ्या दिला जातो. लवकर उठून तीळाने स्थान केली जाते. दक्षिण भारतात देखील हा सण आनंदाने साजरा केला जातो. आसाम आणि बिहूमध्ये पोंगल म्हणून साजरा केला जातो. महाराष्टात महिला हळदी-कुंकूचा कार्यक्रम करतात. शेतात आलेले धान्य एकमेंकाना वाण म्हणून दिला जातो. त्याच बरोबर काळी साडी नेसली जाते.

लहान मोठे या दिवसी मोठ्या उत्साहाने पतंग उडवतात. या मुळे शरिराला व्हिटामीन डी मिळते आणि व्यायाम सुध्दा होतो.

मकर संक्रांतीला सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहेत. मकर ही शनिदेवांची रास आहे. या राशीत सूर्यदेव एक महिना राहणार आहेत. यासाठी मकर संक्रांतीला दान केल्यानं पुण्य लाभतं अशी धार्मिक मान्यता आहे.विशेष करून या दिवशी तीळ दान केल्याने सूर्यदेव आणि शनिदेव यांचा आशीर्वाद मिळतो.

पौराणिक कथेनुसार, सूर्यदेवांना दोन पत्नी आहेत. एकाचे नाव छाया, तर दुसरीचे नाव संज्ञा आहे. शनिदेव हे पत्नी छाया यांचे पुत्र आहे. मात्र शनिदेवांचं वागणं योग्य नसल्याने सूर्यदेव कायम चिंतेत असायचे. एक दिवस सूर्यदेवांनी शनि आणि पत्नी छायाला एक घर दिलं त्याचं कुंभ होतं. ज्योतिषशास्त्रानुसार ही ११ वी रास आहे. कुंभ राशीत शनिदेवांना घर देऊन त्यांना वेगळे केलं. सूर्यदेवांच्या या कृतीने पत्नी छाया यांचा सूर्यदेवांवर कोप झाला आणि त्यांनी सूर्यदेव यांना कुष्ठरोग होईल असा शाप दिला. शापाच्या प्रभावामुळे सूर्यदेवांना कुष्ठरोग झाला. सूर्यदेवाचे दु:ख पाहून त्यांची दुसरी पत्नी संज्ञा हीने यमराजांची आराधना केली. देवीच्या तपश्चर्येने प्रसन्न होत यमदेवांनी सूर्यदेवांना शापातून मुक्त केले. सूर्यदेव पूर्णपणे निरोगी होतात, तेव्हा त्यांची नजर पूर्णपणे कुंभ राशीवर केंद्रित होते. यामुळे कुंभ अग्नीचा गोळा बनतो, म्हणजेच शनिदेवाचे घर जळून जाते. त्यानंतर पत्नी छाया आणि शनिदेव घराशिवाय फिरू लागतात. त्यानंतर सूर्यदेवांची दुसरी पत्नी संज्ञा हिला त्रास जाणवू लागतो. तिला क्षमा करण्याची विनंती सूर्यदेव शनिदेव आणि पत्नी छाया हिला करतात. तसेच शनिदेवांना भेटण्यासाठी सूर्यदेव जातात. तेव्हा त्यांना घरी येताना पाहून शनिदेव आपल्या जळक्या घराकडे पाहतात. घरात जातात आणि एका मटक्यातील तिळ असतात ते आपल्या वडिलांना देऊन स्वागत करतात. यामुळे सूर्यदेव प्रसन्न होतात आणि शनिदेवांना दुसरं घर देतात. या घराचं नाव आहे मकर. मकर ज्योतिष्यशास्त्रातील दहावी रास आहे. तेव्हापासून शनिदेवांकडे दोन घरं असून एकाचं नाव कुंभ आणि दुसऱ्याचं नाव मकर आहे. यासाठी सूर्यदेव आपल्या पुत्राच्या पहिल्या घरात म्हणजेच मकर राशीत प्रवेश करतात. म्हणून या सणाला मकरसंक्राती संबोधलं जातं.सूर्यदेव पुत्र शनिदेवांना त्यांच्या घरी भेटतात आणि ते जवळपास एक महिना तिथे राहतात. यावेळी सूर्य ग्रहाच्या तेजासमोर शनिदेवाचे तेज मावळते. सूर्यदेव पहिल्यांदा शनिदेवांच्या घरी आले तेव्हा त्यांनी वडिलांचे स्वागत काळ्या तिळाने केले होते. यामुळे सूर्यदेव प्रसन्न झाले होता. तेव्हा सूर्यदेवांनी तुझं घर धन-धान्याने भरलेलं राहिल असा आशीर्वाद दिला होता. मकरसंक्रांतीच्या दिवशी स्नान केल्यानंतर पाण्यात काळे तीळ मिसळून सूर्यदेवाला अर्पण करावे. त्यानंतर शनिदेवाची पूजा करावी. त्यांनाही पूजेत काळे तीळ अर्पण करावेत. पूजेनंतर गरीब, गरजू लोकांना मोहरीचे तेल, काळे तीळ, तिळाचे लाडू, उबदार कपडे इत्यादी दान करा. यामुळे शनिदेव प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देतील. मकर संक्रांतीच्या दिवशी तांदळाच्या दानाचेही विशेष महत्त्व आहे.मकर संक्रांती म्हणजेच सूर्याचा मकर राशीत प्रवेश या वर्षी दुपारी २:२९ वाजता होणार आहे. पंचांगानुसार, यावर्षी मकर संक्रांतीच्या स्नानाचा पवित्र कालावधी सकाळी ८.०५ वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत राहील. सकाळी ८.०५ वाजल्यापासून निरयन उत्तरायण सुरू होणार आहे. संक्रांतीचा पवित्र काळ सूर्याच्या मकर राशीत प्रवेश केल्यानंतर सहा तास आधी आणि सहा तासांचा असतो असे शास्त्रात सांगितले आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी स्नान, सूर्यासह नवग्रहांची पूजा आणि भगवान विष्णूची पूजा केल्यानंतर दानधर्म सुरू करावा. तुमच्या श्रद्धेनुसार तुम्ही कपडे, अन्न आणि पैसा दान करू शकता. मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि खिचडी दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. दानाची वेळ सकाळी ८.०५ ते सूर्यास्तापर्यंत असेल.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *