ताज्या बातम्याबीड जिल्हा

बीड शेतकऱ्याच्या मुलींने यूपीएससी परीक्षेत मोठे यश राज्यात पहिला तर देशात 36 वा रँक मिळविला


बीड : शेतकऱ्याच्या मुलींने यूपीएससी परीक्षेत मोठे यश संपादन केलं आहे. घरीच अभ्यास करत राज्यात पहिली तर देशात 36 व्या रँकवर येण्याचा बहुमान या मुलीने मिळावला आहे. पाहुयात पहिल्याच प्रयत्नात या शेतकऱ्याच्या मुलींने कसं यश संपादन केलं?

बीडमध्ये (Beed) शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आणि घरी राहूनच अभ्यास करून, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यशाला गसवणी घालण्याची किमया या बीडच्या कन्येने केली आहे. श्रद्धा नवनाथ शिंदे (Shraddha Shinde) असं त्या तरुणीचे नाव आहे. श्रद्धा यांनी युपीएससीच्या भारतीय अभियांत्रिकी सेवा परीक्षेत राज्यात पहिला तर देशात 36 वा रँक मिळविला आहे. श्रद्धा यांचे वडील हे बीड तालुक्यातील लोणी शहाजानपूर येथील असून अल्पभूधारक शेतकरी आहेत. तर आई गृहिणी असून त्या अशिक्षित आहेत.श्रद्धा यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बीडलाच झाले. नंतर तिने औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रीकल इंजिनीअरींगचे शिक्षण पूर्ण करुन 2018 साली अभियांत्रिकीची पदवी हाती घेतली. त्यानंतर तिने थेट दिल्ली गाठली व सात महिने शिकवणी केली. त्यानंतर जानेवारी 2020 मध्ये UPSC ची प्रिलिमनरी परीक्षाही दिली. या पहिल्याच प्रयत्नात आणि पहिल्याच परीक्षेत तिला यशही मिळाले. त्यात श्रद्धाने राज्यात पहिला तर देशात 36 वा रँक मिळविला आहे. तर तिने याचे श्रेय आई-वडीलांसह गुरुजनांना दिले आहे.

तर याविषयी वडील नवनाथ शिंदे म्हणाले, की मी सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे. लहानपणापासून श्रद्धाची जिद्द होती शिकायची, तिच्या शिक्षणासाठी मी खूप काही केलं असून तिने यामध्ये मोठे यश मिळवले आहे. श्रद्धा हिला मी मुलाप्रमाणे सांभाळले आहे. मुलापेक्षा जास्त तिला मी समजत आहे. त्यामुळे खरंच असा भेदभाव करायची गरज नाही, लोक म्हणतात मुलगी आहे, 18- 20 वर्ष झाले की लग्न करायचं, नको शिकवायचं. मात्र मी तसं केलं नाही. त्यामुळं आज माझ्या जीवनातला सर्वात मोठा आनंद आहे. अशी प्रतिक्रिया श्रद्धाचे वडील नवनाथ शिंदे यांनी दिली आहे.तर याविषयी श्रद्धाची आई म्हणाली, की आज मला खूप आनंद होत आहे. मी पहिली पर्यंत देखील शिकलेली नाही, माझी मुलगी आज शिकलीय मला खूप अभिमान वाटतोय. ती सुरुवातीपासूनच खूप अभ्यास करत होती, एखादा काम सांगितलं तर मला अभ्यास करू दे, असं म्हणायची. आज तिने आमचं नाव खूप मोठा केलं असून मला माझ्या मुलीचा अभिमान वाटतोय. अशी प्रतिक्रिया श्रद्धाच्या आईने दिली आहे.

दरम्यान बीड जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र याच बीड जिल्ह्यातील या शेतकरी कन्येने, यूपीएससी परीक्षेत मोठे यश संपादन करून अभियांत्रिकी क्षेत्रांमध्ये आपलं आणि आपल्या वडिलांसह जिल्ह्याचं नाव कोरलंय. त्यामुळं तिचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *