क्राईमताज्या बातम्याबीड जिल्हा

बीड जिल्ह्यात दरोडेखोरांचा धुमाकूळ


बीड : जिल्ह्यात पुन्हा दरोडेखोरांनी (Robbery) धुमाकूळ घातला आहे. पाटोदा शहरात दोन ठिकाणी मारहाण करत महिलांच्या अंगावरील दागिने व रोख रक्कमही लुटून बेदम मारहाण के दरोडेखोरांनी (Robber) केलेल्या हल्ल्यात चार जण जखमी असून एका वृद्धेला घरातून फरफटत नेत मक्याच्या शेतात टाकले. यामुळे नागरिक दहशती खाली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सात ते दहा दरोडेखोरांनी पाटोदा शहरातल काठ्या, गजांनी मारहाण करत दहशत माजवून लुटालूट केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. शेतकरी तुकाराम नाईकनवरेच्या देवाच्या मळ्यात असलेल्या घरावर हल्ला चढवून घरातील सदस्यांना मारहाण करत सोन्या चांदीच्या दागिन्यांसह नगदी रोकड पळवून नेली.

मांजरसुंबा रस्त्यावर असलेल्या मांजरे नावाच्या व्यक्तीच्या घरीही असाच धुमाकूळ घालून दरोडेखोरांनी मोठा ऐवज लंपास केला. (दीपिकाच्या केसांची अवस्था पाहून नेटकऱ्यांनी दिल्या टिप्स ; कोणी शॉम्पू तर …) नाईकनवरे यांच्या घरी दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात चार जण जखमी असून एका वृद्धेला घरातून फरफटत नेत मक्याच्या शेतात टाकले. 13 वर्षाच्या चक्रपाणी नावाच्या मुलाने दरोडेखोरांना ‘काय न्यायचे तर न्या, परंतु मारहाण करू नका’, असे म्हटल्यानंतर तुकाराम नाईकनवरे आणि त्यांच्या पत्नीला चोरट्यांनी घरात कोंडून सोडून दिले. दरोडेखोरांचा हा धुमाकूळ तब्बल एक तास सुरू होता.

दरोडेखोरांच्या मारहाणीमध्ये चार जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये लक्ष्मी तुकाराम नाईकनवरे, ओंकार गणेश नाईकनवरे, गणेश तुकाराम नाईकनवरे , गिता गणेश नाईकनवरे यांचा समावेश आहे. त्यांना बीड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरोडेखोरांनी दोन्ही महिलांच्या अंगावरील दागिने आणि 70 कट्टे विकलेल्या तुरीचे पैसे आले होते.

ती रोख रक्कम लुबाडून दरोडेखोर पसार झाले. (‘सीमाभागात घुसखोरी अजूनही सुरुच, युद्धात आम्ही जिंकूच’, लष्करप्रमुखांचं विधान) प्रतिकार करणाऱ्या गणेश नाईकनवरेला मात्र प्रचंड मारहाण केल्याने उपचारासाठी चौघांना बीड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर दुसऱ्या ठिकाणी मांजरसुंबा रस्त्यावर असलेल्या मांजरे यांच्या निवासस्थानी दरोडा टाकून त्या ठिकाणाहून नगदी रोकडसह ऐवज चोरून नेला. घटनास्थळी डीवायएसपी यांनी भेट दिली. या घटनेने पाटोदा शहरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणांचा पोलीस अधिक तपास करत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *