ताज्या बातम्या

गाडीची समोरासमोर धडक , दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू


अहमदनग, 11 जानेवारी 2022 :- नगर – दौंड महामार्गावरील घुटेवाडी फाट्यावर दुचाकी व स्विफ्ट गाडीची समोरासमोर धडक होऊन दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. संतोष चव्हाण (रा.भुतकरमळा, सावेडी) असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.नगर दौंड रोडवर श्रीगोंदा तालुक्यातील घुटेवाडी फाट्यावर चिखली घाटात काल दुपारी ५ वाजण्याच्या सुमारास संतोष चव्हाण हे दौड कडून नगरकडे ॲक्टिवा दुचाकी (क्र.एमएच १६ बी क्यू ७७८) वरून जात असताना

चिखली घाट परिसरात ओव्हरटेक करत असताना नगरकडून दौंडकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या स्विफ्ट (क्र.एम.एच १२ जे झेड ७१७२) ने सामोरा समोर धडक दिल्याने दुचाकीस्वार चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला.

या बाबत बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी पोलिस कर्मचाऱ्यांना पाठवले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *