ताज्या बातम्या

जिल्हा पातळीवर आरोग्य यंत्रणा आणखी सुसज्ज करा: पंतप्रधान नरेंद्र मोदी


पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला केंद्रीय मंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. Equip the health system at the district level, Prime Minister Modi ordered

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतच चालली आहे.दरम्यान याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल उच्चस्तरीय बैठक घेऊन देशातील स्थितीचा आढावा घेतला आहे.पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला केंद्रीय मंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी ओमायक्रॉनमुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे.या स्थितीचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा पातळीवर आरोग्य यंत्रणा आणखी सुसज्ज करा. तसेच १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा वेग वाढवा, असे आदेश दिले.

कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ , इटलीहून अमृतसरमध्ये आलेल्या चार्टर्ड विमानामधील १२५ जण कोरोना बाधित
मोदी म्हणाले की, कोरोनाचा विषाणूमध्ये सातत्याने परिवर्तन होत असते. हे लक्षात घेऊन पुरेशा आरोग्य यंत्रणांची खात्री करा. कोरोनाचा विषाणू सतत विकसित होतोय. त्यामुळे नित्यनियमाने चाचण्या घ्या. विषाणू बदलत असल्याने लसीकरण, जिनोम सिक्वेन्सिंगसह वेगवेगळ्या औषधांबाबत सतत वैज्ञानिक संशोधन करणं आवश्यक आहे.

तसेच कोरोनाविरोधातील लढाईत प्रत्येकाने प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करावे. त्यासाठीची जनचळवळ यापुढेही सुरू राहिली पाहिजे.असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सूचित केलं.

Equip the health system at the district level, Prime Minister Modi ordered

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *