ताज्या बातम्या

बाहुबली’ (Baahubali) फेम कटप्पालाही कोरोनाची लागण


कोरोना विषाणूने (Corona) पुन्हा एकदा देशात थैमान घालायला सुरुवात केली आहे. सर्वसामान्यांपासून ते अनेक दिग्गज कलाकार या आजाराला बळी पडत आहेत. अलिकडेच ‘बाहुबली’ (Baahubali) फेम कटप्पालाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

2015 साली बाहुबली चित्रपट फेम कटप्पा आणि दक्षिणेतील दिग्गज अभिनेते सत्यराज यांची तब्बेत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मिळालेल्या एक अहवालानुसार 7 जानेवारी रोजी त्यांना चेन्नईत खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणततीही माहिती मिळालेली नाही. यापूर्वी कोविड पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. बाहुबली चित्रपटामधील (Movie) अभिनेता प्रभासने ज्याप्रमाणे लाखो हृदयांचे मन जिंकले त्याचप्रमाणे कटप्पाने हे स्थान मिळवले आहे.सत्यराज यांना साऊथ इंडस्ट्रीचे सुपरस्टार म्हटले जाते. त्यांनी 1979 मध्ये त्यांच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असले तरी बाहुबलीमधील कटप्पाच्या भूमिकेत त्याला देशभर प्रसिद्ध दिली. ‘चेन्नई एक्स्प्रेस’ (Chennai Express) या चित्रपटात अभिनेता सत्यराज यांनी दीपिकाच्या वडिलांची भूमिका स्कालरली होती हे फार कमी लोकांच्या लक्षात आले असेल. दाक्षिणात्य चित्रपट क्षेत्रात अनेक कलाकारांना कोरोनाची (Corona) लागण होती. यात कमल हसन, चियान विक्रम, वाडीवेलू आणि त्रिशा कृष्णन, महेश बाबू यासारख्या कलाकारांची नावे आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *