राजे यशवंतराव होळकर समाजभुषण पुरस्कार २०२१-२२ स्विकारताना डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
बीड : धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य बीड जिल्हा आयोजित राजे यशवंत होळकर राज्याभिषेक दिनानिमित्त “राजे यशवंतराव होळकर समाजभुषण पुरस्कार २०२१-२२” सामाजिक कार्याबद्दल श्री.मनोज सेराम संस्थापक अध्यक्ष धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य, प्रकाश भैय्या सोनसळे, सरसेनापती धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य, डाॅ.किरण सोनसळे, जिल्हाध्यक्ष, महादेव राहिंज मराठवाडा नेते, कार्याध्यक्ष सोपानराव गावडे, युवक तालुकाध्यक्ष पवन गावडे यांच्या हस्ते तुलसी संगणक महाविद्यालय सभागृहात सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांना प्रदान करण्यात आला यावेळी पुरस्कार स्विकारताना डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर समवेत सहकारी शेख युनुस च-हाटकर, संदिप जाधव ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा मुक्त पत्रकार एस.एम युसुफभाई, मोहम्मद मोईज्जोदीन, सय्यद आबेद, शेख मुबीन आदि उपस्थित होते.