नांदेड : नवीन वर्षापासून (New Year) कोरोना (corona)रुग्णांची संख्या दुप्पटीने वाढत आहे. गुरुवारी (ता. सहा) प्राप्त झालेल्या ९२८ अहवालापैकी ३६ व्यक्तींचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. दिवसभरात दोन रुग्ण बरे झाल्याने त्यास सुटी देण्यात आली. सध्या १३७ रुग्ण उपचार घेत असून त्यापैकी पाच बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे.
जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या ९० हजार ६८२ एवढी झाली असून यातील ८७ हजार ८९० रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या दोन हजार ६५५ एवढ्यावर स्थिर आहे. गुरुवारी नांदेड वाघाळा महापालीका क्षेत्रात १४, नांदेड ग्रामीण एक, मुदखेड सात, नायगाव एक, बिलोली एक, माहूर एक, किनवट चार, कंधार एक, हिंगोली तीन, परभणी एक, चंद्रपूर एक, पुणे एक असे मिळून ३६ जणांचे अहवाल बाधित आले आहेत.
सध्या विष्णुपुरीच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात सात, नांदेड महापालिकातंर्गत गृह विलगीकरणातील १०८, नांदेड वाघाळा महापालिकेच्या श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक रुग्णालयात दोन, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृहविलगीकरणातील १५ तर खासगी रुग्णालयातील पाच असे एकूण १३७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर
नांदेड कोरोना मीटर
एकूण बाधित ९० हजार ६८२
एकूण बरे ८७ हजार ८९०
एकूण मृत्यू दोन हजार ६५५
गुरुवारी बाधित ३६
गुरुवारी बरे दोन
गुरुवारी मृत्यू शून्य
उपचार सुरु १३७
गंभीर रुग्ण पाच