बीड ,यांच्या हातात जिल्हा ! बघा अन लोकहो तुम्हीच ठरवा, काय दिवे लागनार !
बीड- कोणत्याही जिल्ह्यात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे तीन अधिकारी अत्यंत महत्वाचे असतात,विशेषतः कोरोनाच्या काळात यांच्यावर मोठी जबाबदारी आहे,मात्र हे अधिकारी सार्वजनिक कार्यक्रमात किती बेजबाबदार वागतात अन यांच्या हातात जिल्ह्यातील लोकांची सुरक्षा अन आरोग्य आहे हे पाहिल्यावर काय होणार बीड कर नागरिकांना असा प्रश्न पडतो आहे.
एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिसऱ्या लाटेपासून संरक्षण करण्यासाठी कोरोना नियमांचे पालन करण्याबाबत आग्रही आहेत,दुसरीकडे बहुतांश जिल्ह्यातील प्रशासनाने निर्बंध कडककेले आहेत.बीडच्या जिल्हाधिकारी यांनी देखील निर्बंध कडक केले आहेत.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे निर्बंध कडक करण्याचे आणि तोंडावरील मास्क बाजूला न करण्याचे सांगत असताना त्यांचेच नावकरी असलेले बीड जिल्हा परिषदेचे सीईओ अजित पवार मात्र कार्यक्रमात मास्क कधी हनुवटीवर तर कधी बाजूला काढून बसलेले पाहायला मिळाले.
दुसरीकडे जिल्ह्याची कायदा अन सुव्यवस्था तसेच विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचे अधिकार ज्यांना आहेत ते एसपी आर राजा हे देखील विनामास्क कार्यक्रमास हजेरी लावताना दिसून आले आहेत.
ज्या अधिकाऱ्यांवर नागरिकांना शिस्तीचे धडे अन कायद्याचे पालन करण्यासाठी उपाययोजना करण्याची जबाबदारी आहे तेच जर अशा पध्दतीने विनामास्क सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत असतील तर सामान्य नागरिक काय कायदा पाळणार,अन हे अधिकारी कोणत्या अधिकाराने त्यांना नियमाबाबत सांगणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बीडच्या जिल्हा रुग्णालयात विआरडीएल लॅब चे उद्घाटन आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले ,यावेळी आमदार देखील उपस्थित होते,बहुतांश लोकांनी मास्क घातला होता मात्र हे दोन प्रमुख अधिकारी मात्र विनामास्क कार्यक्रमात हजर असल्याचे पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.