आंतरशालेय नाट्यवाचन स्पर्धेचा उद्घाटन समारंभ दिमाखात संपन्न !
मातृभाषा अध्यापक संस्था, पुणे. आणि रोटरी क्लब ऑफ पर्वती, पुणे.यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरशालेय नाट्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषेचा विकास,संवर्धन व्हावे,विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा. या उद्देशाने मातृभाषा अध्यापक संस्था, पुणे . विद्यार्थी व शिक्षकांसाठी
विविध उपक्रम व स्पर्धेचे आयोजन करत असते
. त्यांपैकीच एक उपक्रम म्हणजे नाट्यवाचन स्पर्धेचे आयोजन . नाव्यवाचन करताना विद्यार्थ्यांमधील वाचिक अभिनयास संधी मिळते .या निमित्ताने विद्यार्थ्यांना विविध भावना व्यक्त करताना आवाजात चढउतार कसे करायचे .आवाज लहान मोठा कसा करायचा. कोणत्या शब्दांवर आघात द्यायचा. याविषयी मार्गदर्शन मिळते. विद्यार्थ्यांचे व्यक्तीमत्व घडण्यात याचा मोठा वाटा आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. डॉ. मोहन कांबळे. प्राचार्य, आदर्श बी.एड्. कॉलेज कर्वेरोड, पुणे,यांनी भूषविले. मा . डॉ वृषाली खिरे, अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ-पर्वती पुणे- या प्रमुख पाहुण्या होत्या. सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मा. प्रज्ञा .देशपांडे, सहशिक्षिका , अभिनव विद्यालय, हायस्कूल यांनी आपल्या सुमधूर स्वरात ईशस्तवन सादर केले . सर्व वातावरण मंगलमय झाले .
मा. वंदना आणेकर , मुख्याध्यापिका, अभिनय विद्यालय हायस्कूल, कर्वेरोड, पुणे- उपसचिव, मातृभाषा अध्यापक संस्था यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. मंगला निफाडकर सहकोषाध्यक्ष मातृभाषा अध्यापक संस्था ,पुणे यांनी, संस्थेच्या कार्याचा परिचय करून दिला. मा . डॉ .मोहन कांबळे यांनी व्यक्तीमत्व विकासात नाटयवाचनाचे महत्त्व विषद केले . मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. असे अनेक उपक्रम मराठी भाषेत शालेय स्तरावर होणे आवश्यक आहे .अशा उपक्रमामधूनच भावी उत्तम कलाकार निर्माण होणार आहेत असे विचार त्यांनी व्यक्त केले.मा .वृषाली खिरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रोटरी क्लबचे कार्य कसे चालते. शालेय वयापासून रोटरी क्लबच्या कार्याला कसे जोडून रहायचे याविषयी माहिती दिली.
विद्यार्थ्यांमधील उत्साहाचे त्यांनी कौतुक केले व नाटयवाचनात सहभागी संघांना शुभेच्छा दिल्या .संस्थेचे सल्लागार मा . हेमंत कुबडे,मा. घोरपडे . यांनी शुभेच्छा संदेश पाठवले . मातृभाषा संस्थेच्या अध्यक्षा मा . स्मिता ओव्हाळ यांनी शुभेच्छा संदेशामार्फत संवाद साधला . मा. वृषाली दातार – सदस्य रोटरी क्लब, पर्वती.
मा . पुष्पलता लाड – सेवानिवृत्त शिक्षिका रेणुका स्वरूप विद्यालय, सदाशिव पेठ ,पुणे , मा. अमर कोटबागी – निवृत्त ऑफिसर, नाट्याविषयीची आवड जोपासणारे रोटरी क्लब सदस्य .
मा. शोभा कमलाकर निवृत्त मुख्याध्यापिका – एस.एम जोशी ,हिंदी माध्यमिक विद्यालय , पुलगेट, पुणे .यांनी परीक्षक म्हणून कामगिरी स्वीकारली .
मातृभाषा अध्यापक संस्था सचिव मा .संध्या माने , कोषाध्यक्ष निमल गीताभारती , सहकोषाध्यक्ष मा . मंगल निफाडकर , कार्याध्यक मा . शामला पंडित (दीक्षित ) , संचालिका मा . सुरेखा सोनवणे यांचे कार्यक्रम यशस्वी होण्यास विशेष सहकार्य लाभले .
पूर्ण कार्यक्रमाचे सुसंबद्ध असे सूत्रसंचलन संस्थेच्या कार्याध्यक्षा मा . सुरेखा लेंभे यांनी केले. सौ. शारदा पानगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.