ताज्या बातम्या

10 रिक्षा, 10 मोटरसायकल, 10 माणसांना उडवल्यानंतर बस चालक संजय मोरे म्हणतो काय ?


कुर्ला पश्चिमेला असलेल्या एस.जी.बर्वे रोडवर काल रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात 6 जण दगावले असून 43 जण जखमी झाले आहेत. अपघाताच स्वरुप बघता मृतांचा आकडा वाढण्याची भिती आहे. कुर्ला-अंधेरी मार्गावर धावणाऱ्या बेस्टच्या 332 क्रमांकाच्या बसने एल वॉर्ड ऑफिसपुढे असलेल्या व्हाइट हाऊस बिल्डिंगजवळ अनेकांना चिरडलं.

अनेक वाहनांना धडक दिली. या बेस्ट बसने रस्त्यावरुन चालणाऱ्या अनेक पादचाऱ्यांना चिरडलं. वाहनांना धडक दिली. सोमवारी रात्री 9.30 च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. पाच ते सहा रिक्षा, 10 मोटारसायकलना या बसने उडवलं. सर्वाताआधी बसने रिक्षाला धडक दिली. त्यानंतर आंबेडकर कॉलनीच्या प्रवेशद्वाराला धडकण्याआधी बसने रांगेतील अन्य वाहनं उडवली. फेरीवाले, पादचाऱ्यांना सुद्धा बसने उडवलं.

 

“एकच गोंधळाची स्थिती निर्माण झालेली. एका दहशतवादी हल्ल्यासारखी स्थिती होती. जमावाने बसचा पाठलाग केला व चालकाला पकडून चोप दिला” असं प्रत्यक्षदर्शी कपिल सिंह यांनी सांगितलं. “रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी मी घरातून बाहेर पडलो होतो. मी मोठा आवाज ऐकला. बेस्ट बस पादचारी, रिक्षा आणि कारना धडक देत सुटली होती” असं प्रत्यक्षदर्शी अहमदने सांगितलं. घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिकांनी मदतकार्य सुरु केलं. जखमींना जवळच्या भाभा रुग्णालयात पोहोचवलं. बेदरकारपणे बस चालवल्यामुळे हा अपघात झाला आहे का? हे शोधण्यासाठी बेस्टने आपल्या बाजूने तपास सुरु केला आहे.

 

बस चालकाचा दावा काय?

ब्रेक फेल्युअर एक कारण असल्याच काहींच मत आहे. वाहतूक शाखेचे टेक्निकल एक्सपर्ट पडताळणी करत आहेत. प्रादेशिक वाहतूक अधिकारी रवी गायकवाड यांनी सांगितलं की, “तज्ज्ञ वाहनाची तपासणी करुन अपघाताच नेमकं कारण वाहतूक पोलिसांना सांगतिलं” या अपघातामध्ये तीन शक्यता आहेत तांत्रिक बिघाड, ब्रेकमध्ये बिघाड आणि बेदरकार ड्रायव्हींग. 43 वर्षीय बस चालक संजय मोरेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ब्रेकमधल्या बिघाडामुळे हा अपघात झाल्याचा त्याचा दावा आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *