ताज्या बातम्यादेश-विदेश

लोकसभेवेळी नक्षलवाद्यांसोबत चकमक ! 29 माओवादी ठार, एके-47 सह मोठ्या प्रमाणात स्वयंचलित शस्त्रे जप्त


लोकसभा निवडणुकीत छत्तीसगढ राज्यात मोठी घडामोड घडली आहे. छत्तीसगडमधील कांकेरमध्ये नक्षलवाद्यांसोबत मोठी चकमक झाली. सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 18 माओवादी ठार झाल्याची बातमी आहे.

या चकमकीत दोन जवानही जखमी झाले आहेत. या भागात सध्या जवानांकडून सर्चिंद ऑपरेशन सुरू आहे. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिरिक्त फौजफाटाही घटनास्थळी दाखल झाला आहे. याठिकाणी एके-47 सह मोठ्या प्रमाणात स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, नक्षलवादावरही राजकारण सुरू झाले आहे. छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी काँग्रेसचे माजी गृहमंत्री आणि महासमुंद लोकसभा उमेदवार ताम्रध्वज साहू यांच्यावर नक्षलवादावरुन निशाणा साधला आहे. या चकमकीत तब्बल 29 माओवादी ठार झाले आहेत. आज दुपारपासून या ठिकाणी चकमक सुरू होती. मृतकांमध्ये काही मोठ्या माओवादी नेत्यांचा समावेश आहे. सुरुवातीला 18 मृतदेह सापडले होते. सर्चिंग ऑपरेशनमध्ये ही संख्या वाढून 29 झाली आहे.

दरम्यान, या घटनेवरुन आता राज्यात राजकारण तापलं आहे. छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी काँग्रेसचे माजी गृहमंत्री आणि महासमुंद लोकसभा उमेदवार ताम्रध्वज साहू यांच्यावर नक्षलवादावरुन निशाणा साधला आहे. उपमुख्यमंत्री विजय शर्मा म्हणाले की, पाच वर्षे गृहमंत्री असताना साहू यांनी नक्षलवादाच्या विरोधात काहीही केले नाही. नक्षलवादाच्या विरोधात कोणतीही मोठी पावले उचलली गेली नाहीत. आज भाजप सरकार नक्षलवाद संपवण्यासाठी सतत काम करत आहे.

गेल्या महिन्यातही चकमक
गेल्या महिन्यात 3 मार्च रोजी कांकेर जिल्ह्यातील हिदूर भागात चकमक झाली होती. हिदूर जंगलात झालेल्या या चकमकीत एक जवान शहीद झाला होता. बस्तर फायटर्स कॉन्स्टेबल रमेश कुरेठी असे या जवानाचे नाव आहे. सुरक्षा दलांना येथून एका माओवाद्यांच्या मृतदेहासोबत एके-47 सापडली होती. मिळालेल्या माहितीनुसार, हिदूर जंगलात सर्चिंग मोहीम राबवताना सैनिक निघाले असताना ही चकमक झाली. आतल्या भागात पोहोचताच नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. ही चकमक सुमारे तासभर चालली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *