Video : व्हिडिओताज्या बातम्या

VIDEO: आईसक्रीम विक्रेत्याचं अत्यंत किळसवाणं कृत्य,पोलिसांची कारवाई


तेलंगणाच्या वारंगल जिल्ह्यात रस्त्याच्या कडेला आईसक्रीम विकणाऱ्या एकाने अत्यंत किळसवाणा प्रकार केला आहे. विक्रेत्याने हस्तमैथून करुन फालुदामध्ये आपले विर्य टाकल्याचा दावा करण्यात येत आहे.

यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये आईसक्रीम विक्रेता आक्षेपार्ह कृती (सार्वजनिक ठिकाणी) करत असताना दिसत आहे..

https://twitter.com/TeluguScribe/status/1770076484465729743?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1770076484465729743%7Ctwgr%5Ee1dfabed7ab2a8b33faa255fd4b963776ac5d5da%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

कालुराम कुरबिया असं आरोपीचे नाव आहे. तो नेख्खोंडा भागात आईसक्रीम विकतो. कुरबिया हा राजस्थानचा रहिवाशी आहे. व्हिडिओमध्ये तो आक्षेपार्ह कृती करताना दिसत आहे. त्याला ताब्यात घेण्यात आले असून अधिक तपास केला जात आहे. एकाने हा व्हिडिओ शूट करुन सोशल मीडियावर शेअर केला होता

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांमध्ये संताप निर्माण झाला होता. अन्न अधीक्षकांनी या प्रकरणी काही सॅम्पेल मिळवले आहेत. कुरबिया विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह कृती करणे या भारतीय दंड संहितेच्या कलम २९४ अंतर्गत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी घटनेतील कृतीचा नेमका प्रकार स्पष्ट केलेला नाही. पण, तो काहीतरी आक्षेपार्ह करत होता, असं त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान, बाहेरचं काही खाताना लोकांनी विचार करण्याची गरज आहे. काही लोकांकडून स्वच्छतेला काहीही महत्व दिलं जात नाही. अशाच प्रकारचे किळसवाणे व्हिडिओ सोशल मीडियावर याआधी व्हायरल झाले आहेत. त्यामुळे बाहेरचं खाताना लोकांनी काळजी घ्यावी असं प्रशासन आवाहन करत आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *