ताज्या बातम्या

मनोज जरांगे बिघडवणार EVM चं गणित? निवडणूक आयोगाचीही डोकेदुखी वाढणार!


मनोज जरांगेंनी आपला मोर्चा आता थेट निवडणुकीकडेच वळवल्याचं दिसतंय. यंदाच्या लोकसभेला जरांगे स्वत: निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशी शक्यता तर आहेच, मात्र त्यासोबतच राज्यभरात प्रत्येक लोकसभेच्या जागेवर हजारो मराठा उमेदवार अर्ज भरण्याची शक्यता आहे.

खुद्द जरांगेंनीच या गोष्टीला हवा दिली आहे. आता हजारो उमेदवार जर निवडणुकीच्या रिंगणात आले, तर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांना मोठी कसरत करावी लागू शकते. यामुळे निवडणूक आयोगाचीही डोकेदुखी वाढेल. हजारो उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेच तर निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर होतील का? असा सवालही पुढे येतोय.

मनोज जरांगेंच्या मनात काय?

प्रत्येक गावातून लोकसभेला 5 ते 7 उमेदवार उभे करायचे

तालुक्यातून 250 हून अधिक उमेदवार उभे राहणार

प्रत्येक जिल्ह्यात एक हजारहून अधिक उमेदवार

ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांनीही डिपॉझिट भरायचं

ज्यांच्याकडे डिपॉझिट भरायला पैसे नाहीत, त्यांच्यासाठी गावाने पैसे जमा करायचे

उमेदवार वाढले तर काय होणार?

जिथे आधी एका जागेवर 15 ते 16 उमेदवार दिसायचे तिथे हजार उमेदवार दिसतील

निवडणूक आयोगाला तितकीच चिन्हही वाटावी लागतील

तितक्याच पटीत ईव्हीएमची संख्याही वाढवावी लागेल

ईव्हीएम वाढली तर मतदान करताना अधिकचा वेळ लागणार

मतदारांमध्ये चिन्ह आणि उमेदवाराबाबत संभ्रम निर्माण होईल

एका ईव्हीएम बॅलट युनिटवर 16 उमेदवार असू शकतात

त्याहून अधिक उमेदवार झाल्यास 16 च्या पटीनुसार मशीन वाढवावी लागणार

सध्या ईव्हीएमचं तिसरं व्हर्जन त्यात 24 बॅलटिंग युनिट वाढवता येतात

एका केंद्रात 384 उमेदवारांसाठी मतदान होऊ शकतं

त्याहून अधिक उमेदवार वाढवण्याची सोय सध्याच्या सिस्टीममध्ये नाही

काय म्हणाले माजी सहनिवडणूक आयुक्त?

अशा प्रकारे उमेदवारांची संख्या वाढली आणि ती 300 पेक्षा जास्त झाली तर ही निवडणूक मतदान पत्रिकेवर घेणंही निवडणूक आयोगासाठी कठीण होईल, असं मत माजी सह निवडणूक आयुक्त शिरीष मोहोड यांनी व्यक्त केलं.

’32 वा उमेदवार आला तर तिसरं बॅलट होईल. 48 वा उमेदवार आला तर चौथं बॅलट होईल, त्यामुळे आपल्याला बॅलट युनिट्स वाढवावी लागतील. बॅलट युनिट्स वाढवणं अशक्य नाही, पण प्रशासकीयदृष्ट्या अडचणीचं होऊ शकतं,’ असं शिरीष मोहोड म्हणाले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *