जम्मू-काश्मीरच्या बारामुला येथे आज, रविवारी सकाळी दहशतवाद्यांनी मशिदीवर हल्ला केला. यावेळी एका सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याचे टार्गेट-किलींग करण्यात आले.
यासंदर्भात जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी आज, रविवारी सकाळी बारामुल्लाच्या जेंटमुल्ला येथील मशिदीवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यावेळी मशिदीत नमाज करणारे सेवानिवृत्त एसएसपी मोहम्मद शफी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हल्ल्यानंतर घटनेनंतर मोहम्मद शफी यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर दहशतवादी पळून गेले. सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला असून दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या 4 दिवसांतील ही तिसरी मोठी दहशतवादी घटना आहे. यापूर्वी 23 डिसेंबर रोजी अखनूरमध्ये दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला होता.तर 21 डिसेंबर रोजी राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला होता. यामध्ये 5 जवान शहीद होते.
Video कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळल्याने राज्य सरकार अलर्ट मोडवर; आरोग्य यंत्रणांना दिले निर्देश