ताज्या बातम्या

आता नाही राहणार रेशन कार्ड! सरकारचा आहे हा प्लॅनिंग


शिधापत्रिका अर्थात रेशन कार्ड हे एक महत्त्वाचे कागदपत्र असून अनेक शासकीय कामांमध्ये याचा वापर केला जातोच.परंतु शासनाच्या ज्या काही स्वस्त धान्य योजना आहेत त्या अंतर्गत मिळणारे धान्य देखील रेशन कार्ड च्या माध्यमातूनच वितरित केले जाते हे आपल्याला माहिती आहे.

समाजामधील जे काही पात्र गरजू आणि गरीब नागरिक आहेत त्यांना सरकारच्या माध्यमातून देण्यात येणारे स्वस्त धान्य मिळावे याकरता रेशन कार्ड तयार करण्यात आलेले होते. आपल्याला माहित आहेच की एका कुटुंबासाठी एक रेशन कार्ड दिले जात होते व यावर सगळ्या कुटुंबाच्या सदस्यांची नावे असायची.

या रेशन कार्ड च्या माध्यमातून कुटुंबातील सर्व लहान व मोठ्या व्यक्ती किती आहेत या प्रमाणामध्ये धान्याचे वितरण केले जात होते. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनांद्वारे रेशन कार्डच्या माध्यमातून धान्य दिले जाते. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा देखील लाभ या माध्यमातूनच मिळतो.

परंतु बऱ्याचदा काही कामानिमित्त बरेच कुटुंब हे गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी राहायला जातात. परंतु त्यांच्या रेशन कार्डवर गावाकडचा पत्ता असे. त्यामुळे त्यांना धान्य देखील गावाकडील स्वस्त धान्य दुकानावरच मिळते. परंतु संबंधित कुटुंब गावाकडे राहत नसल्यामुळे त्यांचा धान्याचा कोटा आहे तसाच राहत होता व या माध्यमातून शासनाचा जो काही मूळ उद्देश आहे तो साध्य होत नव्हता. परंतु आता या महत्त्वाचे असलेले रेशन कार्ड म्हणजे शिधापत्रिका आता इतिहास जमा केली जाणार असून त्या ठिकाणी आता शासन ई शिधापत्रिका देणार आहे.

शिधापत्रिकाहोणारबंद, त्याऐवजीयेणारईशिधापत्रिका

आता शिधापत्रिका ऐवजी ई शिधापत्रिका देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून आता जिल्ह्यातील सेतू तसेच महा-ई-सेवा केंद्र, आपले सरकार केंद्र चालकांना लवकरच आता या प्रक्रियेचे प्रशिक्षण दिले जाणार असून त्यामुळे आता शिधापत्रिका बंद होण्याच्या मार्गावर आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून ज्या काही योजना राबवल्या जातात अशा अनेक योजनांच्या माध्यमातून गरजू आणि गरीब नागरिकांना धान्य दिले जाते. परंतु बरीच कुटुंबे ही काही काम किंवा नोकरीनिमित्त मूळ गावी राहत नाही. परंतु त्यांच्या रेशन कार्डवर त्यांच्या गावाचाच पत्ता असल्याने त्यांना धान्य घ्यायचे असेल तर ते त्यांच्या गावाकडील स्वस्त धान्य दुकानांमध्ये मिळते.

परंतु असे कुटुंब बऱ्याचदा धान्य घेण्यासाठी गावी जात नव्हते व या माध्यमातून शासनाचा मूळ हेतू साध्य होत नव्हता. त्यामुळे या कुटुंबासाठी आलेल्या धान्याची परस्पर काळा बाजारामध्ये विक्री करण्याचे प्रकार देखील घडत होते. रेशन दुकानांच्या माध्यमातून धान्य विक्रीचे जे काही गैरप्रकार होतात त्यांना आळा बसावा आणि गरीब कुटुंबांना धान्य मिळावे याकरिता रेशन कार्ड यांना बाराअंकी क्रमांक देण्यास सुरुवात करण्यात आलेली होती व या क्रमांकाकरिता कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आधार कार्ड आणि हाताचे ठसे द्यावे लागतात.

ही जी काही संपूर्ण प्रक्रिया आहे ही शासनाच्या पुरवठा विभागाच्या देखरेखीखाली पार पाडले जात होते. त्यामुळे कुठल्याही धान्य दुकानातून तुम्हाला रेशन घ्यायचे असेल तर हाताचे ठसे देऊनच ते घेता येत होते. म्हणजेच एकंदरीत ज्यांचे शिधापत्रिका ऑनलाईन केले आहेत त्यांनाच या योजनांचा लाभ मिळत होता.

शिधापत्रिकाऐवजीमिळतीलआताईशिधापत्रिका

परंतु आता शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली सर्व शिधापत्रिका देण्याचे बंद करणार असून आता येणाऱ्या कालावधीत त्या ऐवजी ई शिधापत्रिका दिल्या जाणार आहेत. ज्यांच्याकडे शिधापत्रिका आहे त्यांना या ई शिधापत्रिका मिळणार आहेत. यासाठी मोबाईलवर ॲप्लिकेशन डाऊनलोड करून या योजने करिता आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत.

तसेच तहसील कार्यालयामध्ये पुरवठा निरीक्षक आणि तहसीलदार या कागदपत्रांची पडताळणी करतील व नंतर ई शिधापत्रिका मंजूर केली जाणार आहे. ज्या नागरिकांना मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये कागदपत्रे अपलोड करायला शक्य होणार नाही असे नागरिक सेतू, महा-ई-सेवा केंद्र आणि आपले सरकार केंद्रामध्ये जाऊन याकरिता कागदपत्रे अपलोड करू शकणार आहेत.

यामुळे आता रेशन कार्ड काढण्यासाठी जे काही फसवणूक होते किंवा मध्यस्थामार्फत पैशांची देवाणघेवाण होते अशा गैरप्रकारांना देखील आता आळा बसणार आहे. कारण ही प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन असणार असल्यामुळे असे गैरप्रकार थांबण्यास मदत होणार आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *