पुणे : पुणे शहरातील पिंपरी चिंचवडमध्ये मोठी आग लागलेली आहे, आगीत 6 जणांचा होरपळून मृत्यू झालाय तर आणखी काही कामगार त्यात फसल्याचं बोललं जातंय. तळवडे येथील फटाका गोदामाला ही आग लागली होती, अशी सूत्रांकडून माहिती मिळतीये.
पिंपरी चिंचवड (पुणे) Fire In Pimpri Chinchwad: हे फटाका गोदाम विनापरवाना सुरू होते, असंही म्हटलं जात आहे. काहीवेळा पूर्वी लागलेल्या या आगीवर अग्निशमन दलाचे जवान नियंत्रण मिळवत आहेत. दुसरीकडे सात ते आठ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल आहेत. आतापर्यंत सात मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत, आणखी कामगारांचा शोध सुरू आहे. (6 people died in fire)
सहा महिलांचे मृतदेह बाहेर: अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली आहे. कारखान्यात आणखी कोणी अडकले आहे का याचा शोध सुरू आहे. आतापर्यंत सहा महिलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. आणखी कामगारांचा शोध सुरू आहे.
जखमींमध्ये सात महिला आणि एक पुरुष: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या देहूरोड पोलीस ठाणे अंतर्गत हा कारखाना आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींमध्ये सात महिला आणि एक पुरुष आहे.
सहा जणांचा होरपळून मृत्यू: पिंपरी चिंचवडमध्ये वाढदिवसाच्या मेणबत्या आणि फटाक्याच्या गोदामाला ही आग लागली आहे. या भीषण आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आगीत आणखी काही कामगार अडकल्याचे म्हटले जात आहे. तळवडे येथील फटाका गोदामाला ही आग लागली असून ती विनापरवाना सुरू होती, अशी माहिती मिळतेय.