ताज्या बातम्या

आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घेण्यास गृहमंत्री फडणवीसांचा नकार


मनोज जरांगे पाटलांनी आंतरवाली सराटीमध्ये २९ ऑगस्ट पासून आमरण उपोषण केले असताना आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज झाला होता. या आंदोलनात सहभागी असलेल्या मराठी कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते.
हे गुन्हे सरसकट मागे घेण्यास गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात ठामपणं नकार दिला आहे.

मुंबई : संपूर्ण राज्यात मराठा आरक्षणाचा विषय पेटलेला असताना राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेमध्ये जालन्यातील अंतरवाली सराटीत पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जबाबत आपले लेखी उत्तर सादर केले आहे. त्या दिवशी झालेल्या घटनेशी संबंधित संपूर्ण तपशील सादर करत कोणत्याही स्थितीमध्ये सरसकट गुन्हे मागे घेण्यास त्यांनी ठाम नकार दिला. गृहमंत्री फडणीस यांनी आज दिलेल्या लेखी उत्तरातून मराठा नेते मनोज जरांगे पाटलांना जोरदार धक्का दिला आहे.

आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यास देवेंद्र फडवणीसांचा ठाम नकार- लाठीचार्जच्या घटनेचा संपूर्ण विस्तृत असा तपशील आज देवेंद्र फडवणीस यांनी विधानसभेत सादर केला. हा तपशील सादर करत असताना त्यांनी लाठीचार्ज प्रकरणी काही आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यास ठाम नकार दिला आहे. अंतरवाली सराटीत पोलिसांनी बचावात्मक व वाजवी पद्धतीने त्यांच्या बळाचा वापर केला. तसेच या घटनेत जवळपास ५० आंदोलन व ७९ पोलीसकर्मी जखमी झाले आहेत. या कारणास्तव सर्व बाबींची माहिती घेतल्यानंतरच या प्रकरणी गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे फडवणीस यांनी म्हटले आहे.

लाठीचार्जमुळे राज्यात तणाव वाढला – मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटलांनी आंतरवाली सराटीमध्ये २९ ऑगस्ट पासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली होती. यादरम्यान पोलिसांनी त्यांच्या आंदोलकांवर लाठीचार्ज केला. त्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली. विरोधकांनी लाठीचार्जबाबत गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांना जबाबदार ठरवले. अखेर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः आंदोलकांची माफी मागितली होती. या लाठीचार्जच्या झालेल्या प्रकरणानंतर जरांगे पाटलांची राज्यभरातील ताकद फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *