‘जवान’ची चर्चा रंगलेली असताना समीर वानखेडेनी मात्र पाहिला ‘हा’ मराठी सिनेमा
मुंबई, 09 सप्टेंबर : सध्या सगळीकडे शाहरूख खानच्या ‘जवान’ या सिनेमाची चर्चा सुरू आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक थीएटर बाहेर तुफान गर्दी करत आहेत. या सिनेमातील एक डायलॉग सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत आहे.
विशेष म्हणजे यामुळे अधिकारी समीर वानखेडे हे देखील चर्चेत आले आहेत. बेटे को हात लगाने से पहले बाप से बात कर…असा तो डायलॉग आहे.आता एकीकडे शाहरूखच्या सिनेमाची चर्चा असताना दुसरीकडे समीर वानखेडे यांनी ‘सुभेदार’ हा सिनेमा पाहिला. त्यामुळे पुन्हा एकदा समीर वानखेडे चर्चेत आले आहेत. समीर वानखेडे यांनी सुभेदार सिनेमा पाहिल्यानंतर पोस्ट शेअर केली आहे.प्रोटीन शेक नाही, पीतो 5 लीटर…; अक्षय कुमार फॉलो करतो हे 9 फिटनेस मंत्रसमीर वानखेडे यांनी मॉलमधील एक व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडीओत ते चित्रपट पाहायला आल्याचं दिसतंय. “एक महान योद्धा आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असलेले सुभेदार तानाजी मालुसरे यांच्यावर आधारित एक सुंदर मराठी चित्रपट पाहण्याची संधी मिळाली. त्यांचे नाव पराक्रम आणि शौर्याचे प्रतिक आहे. प्रत्येक भारतीयाने अनुकरण करावे, असे ते खरे वीर होते,” असं समीर वानखेडेंनी म्हटलं आहे.