ताज्या बातम्या

तर मी रामदास आठवले ऐवजी रामदास आंबेडकर झालो असतो, आठवले असं का म्हणाले?; काय आहे कारण?


प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल मला आदर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ते नातू आहेत. नातू होण्याची संधी मला मिळाली नाही. माईसाहेब आंबेडकर मला दत्तक घेण्याची शक्यता होती.तसे झाले असते तर मी रामदास आठवले ऐवजी रामदास आंबेडकर झालो असतो, असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल आदर आहे. ते हुशार आहेत. पण कोणत्यावेळी कोणती भूमिका घ्यावी हे त्यांच्या लक्षात येत नाही. माझ्या लक्षात येतं. त्यामुळे त्यांनी मतं खाण्याचं काम करू नये, असं आवाहनही रामदास आठवले यांनी केलं.

 

यवतमाळमध्ये आले असता रामदास आठवले बोलत होते. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही भाष्य केलं. अजित पवार हे युतीत आल्याने भाजपच्या मतांवर काहीच परिणाम होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. अजित पवार, एकनाथ शिंदे या सगळ्यांना मंत्रीपद मिळाले. आम्हाला मिळाले नाही. मंत्रिपद द्यावं ही आमची मागणी आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विस्तारत मंत्री पद देऊ म्हणून सांगितले होते. मात्र अजित पवार यांचा विस्तारात समावेश होईल हे मलाही माहिती नव्हतं. असं असलं तरी आरपीआयला मंत्रीपद मिळावं ही आमची मागणी कायम आहे, असं रामदास आठवले म्हणाले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *