मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कंटेनर उलटल्याने पाच गाड्या दबल्या
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कंटेनर उलटून पाच गाड्यांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर दोन जणांनी आपला जीव अपघातमध्ये गमावला आहे.अपघातामध्ये चार जण जखमी झाले आहेत, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं रायगड पोलिसांनी जाहीर केलं आहे.
स्पीडमध्ये असलेला कंटेनर उलटला असल्याची माहिती तिथं अपघात पाहिलेल्या लोकांनी पोलिसांना सांगितलं आहे. गाड्यांचं अधिक नुकसान झालं आहे. तिथल्या गाड्या बाजूला घेण्याचं काम सुरु आहे.
जखमी लोकांना जवळच्या रुग्णालया दाखल केलं आहे. जखमी लोकांमध्ये काहीजण गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. एका एर्टीगा गाडीचं पूर्ण नुकसान झालं आहे. ती गाडी रस्त्याच्या एका कोपऱ्यात दिसत आहे.
एक अल्टो गाडी खराब झाली आहे, कंटेनर रस्त्यात पलटी झाला आहे. त्यामुळे गाड्यांचं अधिक नुकसान झालं असल्याचं पोलिस सांगत आहेत, क्रेनच्या साहाय्याने कंटेनर बाजूला घेण्याचं काम सुरु आहे.