कुर्ला पश्चिम येथील सुभाष नगरमध्ये इमारतीच्या संरक्षक भिंतीचा भाग कोसळला आहे. रात्री आठ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली.
ही संरक्षक भिंत खाली असलेल्या घरांवर पडून वैष्णवी प्रजापती या 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे.सुभाषनगर येथील जैन सदन या इमारतीच्या संरक्षक भिंतीला लागून पाच घरे आहेत.
यातील तीन घरांवर रात्री अचानक संरक्षक भिंत कोसळली.
मध्यावर असलेल्या प्रजापती कुटुंबाच्या घरावर भिंतीचा मोठा भाग कोसळला.
यात वैष्णवी चिरडली गेली आणि जागीच तिचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचावकार्य सुरु केले.
वैष्णवीला बाहेर काढून पालिकेच्या राजावाडी रुग्णालय पाठवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेत तीन घरांचेही मोठे नुकसान झाले आहे.