भारतीय संघ सध्या विश्वचषकाच्या तयारीला लागला आहे. त्याआधी खेळल्या जाणाऱ्या आशिया चषकासाठी भारताचा संघ घोषित करण्यात आला आहे. या स्पर्धेत भारताच्या नेतृत्वाची जबाबदारी रोहित शर्माच्या खांद्यावर असणार आहे.आशिया चषकासाठी संघ घोषित झाल्यावर रोहित शर्माचा एक व्हिडीओ व्हायरलं होत आहे, ज्यात त्याने संघ्याच्या बॅटिंग ऑर्डरबद्दल वक्तव्य केले आहे. संघात खेळताना कोणत्याही क्रमाकांवर खेळण्याची तयारी हवी, असे मत त्याने व्यक्त केले.
रोहित शर्माने जेव्हा आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली, तेव्हा तो मधल्या फळीत फलंदाजीसाठी यायचा. त्यानंतर त्याला सलामीवीर म्हणून संधी मिळाली.
संघातील बॅटिंग ऑर्डरबद्दल रोहित म्हणाला की, “खेळाडूंमध्ये कोणत्याही पोजिशनवर खेळण्याची लवचिकता हवी. चौथ्या क्रमाकांचा फलंदाज सहाव्या क्रमांकावर येऊन फलंदाजी करु शकतो. मात्र, पहिल्या क्रमांकावर खेळणाऱ्या आठव्या क्रमांकावर खेळायला पाठवणे आणि आठव्या क्रमांकाच्या खेळाडूला ओपनिंग करायला देणे, असा वेडेपण आम्ही करत नाही.”
“अभिमानाचा क्षण! चांद्रयानाच्या लँडिंगचा सोहळा मुलांसोबत पाहणार”; करिना कपूर झाली भावूक
आशिया चषकासाठी भारतीय घोषणा सोमवारी (दि.२१ ऑगस्ट) करण्यात आली. आशिया चषक स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाविरुद्ध आहे. २ सप्टेंबरला भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना रंगणार आहे.
आशिया चषक संपल्यावर भारतीय संघ विश्वचषकाच्या तयारीला लागेल. यंदा विश्वचषकाचे आयोजन भारतात करण्यात आले आहे. ऑक्टोबर महिन्यात या स्पर्धेला सुरुवात होईल.
आशिया चषकासाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, केएल राहुल, तिलक वर्मा, इशान किशान, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकुर, अक्सर पटेल, कुलदीप यादव, जस्प्रित बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन