मी नाराज म्हणून ब्रेकिंग करू नका.. शिंदे गटाच्या आमदाराने स्नेहभोजनाबद्दल आधीच केला खुलासा
मुंबई- मुख्यमंत्र्यांचं स्नेह भोजन हे ऑगस्ट पूर्वी किंवा नंतर हे परदेशातून स्वातंत्र दिना दिवशी येणाऱ्या राजदूतांसाठी असतं. ते आमदारांना नसतं. त्यामुळे उदया मी स्नेह भोजनाला नाही गेलो, तर नाराज म्हणून ब्रेकिंग करू नका, असं शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी म्हटलं.
शिरसाट यांनी यावेळी विविध विषयांवर भाष्य केलं. प्रशासन कळायला अक्कल लागते अंबादास दानवेंना ते अजून कळालेलं नाही, असं म्हणत त्यांनी बोचरी टीका केली. भरत गोगावले काय बोलले ते मला माहित नसल्याचं ते म्हणाले.महाजन यांनी केलेलं स्टेटमेंट योग्यचं आहे. दररोज भाजप व शिवसेनेकडे लोकांचा ओढा वाढत चाललाय, असं ते म्हणाले अजित पवार व शरद पवार याच्यात काही फाटलेलं नाही. तुम्हाला जो अर्थ काढायचा तो काढा. आमचं जास्त ताणलं म्हणून तुटलं. बंदुक लावलेली माणसं जास्त काळ सोबत टिकत नाही. आम्ही हेतूने एकत्र आलो आहोत, असं ते म्हणाले. शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. संजय राऊत याचं एकतं कोण, असं ते म्हणाले.
२०२४ मध्येही एनडीए आणि पंतप्रधान मोदीच येणार आहेत. India ची बैठक कशी होईल याची चिंता सुरू आहे. या बैठका कोण काय देणार यासाठी आहे. काँग्रेसची भूमिका दरवेळी बदलत जाते, अशी टीका त्यांनी केली.
अजित दादा किंवा इतर नेते नवाब मलिकांना जरी भेटायला गेले, ते तब्येतीची विचारपूस करायला गेले होते. मलिकांनी आता त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. अल्लाचं नाव घ्यावं. मलिक यांच्या मंत्रिमंडळाबाबत बोलण्याआधी ते कुठे जातात ते आधी त्यांना ठरवू द्या, मग आम्ही भूमिका घेऊ, असं ते म्हणाले.