ताज्या बातम्या

सांगोल्यात शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर


शेकापचे दिवंगत नेते भाई गणपतराव देशमुख यांच्या स्मारकाचे अनावरण आज (दि. 13) होणार आहे. या कार्यक्रम प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सांगोल्‍यात एकाच मंचावर येणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर प्रथमच शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमने-सामने येणार आहेत. त्‍यामूळे दोघेही काय बोलणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच, पुणे येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौ-यावेही दोघेही एकाच मंचावर होते. परंतु यावेळी राज्यपाल, मुख्यमंत्री, अजितदादा पवार असे सर्वजण उपस्थित होते.

दरम्‍यान, शरद पवार आणि राज्‍याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात गुप्त बैठक झाली आहे. ही बैठक सुमारे साडे तीन तासाहून अधिक काळ पार पडली. आज शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर येणार आहेत. त्यामुळे आता हे दोन नेते नेमके काय बोलणार आहेत याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

चिखल तुडवत काढावी लागते वाट ; नगरसेवकांसह मनपाने लक्ष देण्याची मागणी


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *