ताज्या बातम्या

बीड : शिक्षकाच्या घराला आग,आगीत २ लाखांचे संसारोपयोगी साहित्य खाक


परळी शहरातील जुना गावभाग म्हणून ओळख असलेल्या गणेशपार विभागातील एका शिक्षकाच्या घराला आग लागली. ही घटना आज (दि.४) सकाळी ११ वाजता घडली. या आगीत सुमारे २ लाख रुपयांचे संसारोपयोगी साहित्य जळून भस्मसात झाले.

परळी शहरातील गणेशपार विभागात राहत असलेले शिक्षक दिलीप कडगे यांच्या घरातील स्वयंपाकघराच्या खोलीस अचानक आग लागली. नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही आग वेळीच आटोक्यात आणली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. शिक्षक दिलीप कडगे शाळेत गेले होते. तर घरात पत्नी, मुलगा दुसऱ्या खोलीत होते. यादरम्यान स्वयंपाक घरास अचानक आग लागून धूर बाहेर पडू लागल्याचे शेजाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले.

अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी ही आग विझविली. परंतु, किचन रूममधील दोन लाख रुपयांचे साहित्य, फॅन, दरवाजे, खिडक्या व इतर साहित्य आगीत जळाले. आग कशामुळे लागली याचे कारण स्पष्ट झालेले नाही.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *