मराठवाडा सुरूवातीला निजामांच्या ताब्यात होता त्यामुळे आताचे परभणी हिंगोली जिल्हे त्याकाळी निजामांच्या ताब्यात होते. विदर्भ प्रांताला सिमा जोडलेल्या असल्याने निजामाचे सैन्य या भागात वास्तव्याला होते, सैनिकांकरता उपचार, पशुचिकीत्सा, शस्त्रक्रिया हिंगोलीमधे होत असत.
1803 ला झालेले टिपु सुल्तान आणि मराठे यांचे युध्द आणि भोसल्यांसोबतचे 1857 चे युध्द अशी दोन युध्द हिंगोली ने अनुभवली आहेत. त्याकाळी पडलेले पल्टन, रिसाला, तोपखाना, पेंशनपुरा, सदर बाजार, ही नावं आज देखील प्रसीध्द आहेत.
हिंगोली जिल्हयातील तालुके –
1) हिंगोली
2) कळमनुरी
) सेनगांव
4) औंढा नागनाथ
5) बसमत
हिंगोली जिल्हयातील पर्यटन स्थळं –
हिंगोली जिल्हयात पर्यटनाकरता चांगली स्थळं अस्तित्वात आहेत. बारा ज्योर्तिलिंगापैकी एक औंढा नागनाथ हे ज्योर्तिलिंग याच जिल्हयात आहे.
त्याशिवाय सिध्देश्वर बांध, तुळजादेवी संस्थान, इसापुर धरण, मल्लीनाथ दिगंबर जैन मंदीर, भगवान शांतीनाथ जिनालया ही ठिकाणं पाहाण्यासारखी आणि धार्मीक स्थानं म्हणुन देखील प्रसीध्द आहेत.
- औंढा नागनाथ –
बारा ज्योर्तिलिंगामधे आठवे ज्योर्तिलिंग आहे औंढयाचा नागनाथ. मंदीराच्या अनेक दंतकथा, आख्यायिका ऐकायला मिळतात. आताच्या मंदीराला यादवांच्या वंशाने 13 व्या शतकात बनवल्याचे बोलले जाते.
पुरातन मंदीर महाभारताच्या काळापासुन अस्तित्वात असल्याचे देखील कित्येकांचे म्हणणे आहे, ज्यावेळी पांडवांना 14 वर्षांकरता हस्तीनापुरातुन बहिष्कृत करण्यात आले त्यावेळी पांडवांमधे सगळयात मोठया युधीष्ठीराने या मंदीराची स्थापना केली होती.
हे मंदीर सात मजली होते पण औरंगजेबाकरवी याला उध्वस्त करण्यात आले त्यामुळे सध्याचे हे मंदीर असे आहे. मंदीराचे गर्भगृह छोटे असुन ब्राम्हणांकरवी जप जाप्य आणि मंत्रोच्चाराने वातावरण मंत्रमुग्ध असते. माघ महिन्यात मोठया यात्रेला सुरूवात होते ही यात्रा फाल्गुन महिन्याच्या सुरूवातीपर्यंत सुरू असते.
याशिवाय महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात असंख्य भाविक येथे दर्शनाकरता रिघ लावतात. मंदीराचे बांधकाम हेमाडपंथी असुन रेखीव नक्षीकाम पाहाण्यासारखे आहे.
- सिध्देश्वर बांध –
हिंगोली जिल्हयात सिध्देश्वर बांध हा परिसर देखील निसर्गानं वेढलेला आहे. संपुर्ण पाण्याने वेढलेला परिसर, निरनिराळे पक्षी, आजुबाजुला लहान लहान डोंगर रांगा, वड पारंब्यांचे पुरातन वृक्ष, आजुबाजुची शेती या सगळया नैसर्गिक वातावरणामुळे या ठिकाणी आल्यानंतर परत जावुच नये असे वाटते. या परिसराला भेट दिल्यानंतर निश्चितच आनंदाची अनुभुती मिळते.
- तुळजादेवी संस्थान:
साधारण 125 वर्षांपुर्वी केशवराज स्वामींना तुळजाभवानी ने दर्शन दिले त्यानंतर त्यांना गुफेच्या खोदकामादरम्याने देवीची मुर्ती मिळाली तेव्हां केशवराज स्वामींनी त्याच स्थानावर मंदीराची निर्मीती केली. 1967 साली मंदीराच्या व्यवस्थापनेकरता एका ट्रस्ट ची स्थापना केली गेली, आता त्यातुन विद्याथ्र्यांना शिष्यवृत्ती, यात्रेकरूंकरता निवासस्थान, आरोग्यसेवा अश्या सेवा पुरवल्या जात आहेत. नवरात्रात, चैत्र पौर्णिमेला भाविकांच्या लांबचलांब रांगा बघायला मिळतात.
- संत नामदेव संस्थान:
नरसी नामदेव म्हणुन प्रसीध्द असलेले हे ठिकाण हिंगोली आणि रिसोड च्या मधे आहे. नरसी हे संत नामदेवांचे जन्मस्थान! नामदेवांचा जन्म 1270 साली झाला असुन त्यांचे पुर्ण नाव नामदेव दामाजी रेलेकर असे आहे. गावाची लोकसंख्या साधारण 8000 असुन संतांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी मोठी यात्रा भरते.
राज्य सरकारने नरसी ला पवित्रस्थान आणि पर्यटन केंद्र म्हणुन घोषीत केले आहे. इथे शासनाकरवी पर्यटकांकरता निवासस्थान देखील बांधण्यात आले आहे.
पंजाबातील संत नामदेवांचे अनुयायी आणि भारतभरातील भाविक नरसिला नेहमी येतात, आता शिख अनुयायी नरसीत एका गुरूव्दाराची निर्मीती देखील करतायेत तसच संत नामदेवांचे स्मारक बांधण्याचा देखील त्यांचा मानस आहे.
- मल्लीनाथ दिगंबर जैन मंदीर –
हिंगोलीपासुन 35 कि.मी. अंतरावर औंढानागनाथ तालुक्यात शिराद शाहपुर या गावी जैन बांधवांचे हे ऐतिहासिक मंदीर आहे जे साधारण 300 वर्षापुर्वीचे असल्याचे दाखले आहेत. तिर्थयात्रा करणा.यांकरता इथे निवासाची चांगली सोय करण्यात आली आहे. संपुर्ण भारतातुन जैन तिर्थयात्री येथे दर्शनाकरता येत असतात.
- इसापुर धरण –
इसापुर धरण देखील हिंगोली पासुन जवळ भेट देण्यासारखे ठिकाण आहे. पुसद पासुन जवळ असलेले हे धरण पैनगंगा नदीवर बांधण्यात आलेले महाराष्ट्रातील मोठया धरणांपैकी एक धरण आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठया धरणापैकी एक असलेले हे धरण जवळपास साडे तीन कि.मी. लांब आहे.
या धरणाच्या साधारण 1 कि.मी. अंतरावर शेम्बळेश्वर मंदीर आहे. आणि जवळच 6 कि.मी. अंतरावर अंशुलेश्वराचे देखील पुरातन मंदीर आहे.
या व्यतिरिक्त हिंगोलीत, तलावातील जळेश्वर मंदीर, मंगळवाडा मधले श्री. दत्त मंदीर, खटकली मधले दक्षिणमुखी हनुमान मंदीर, बरशिव हनुमान मंदीर ही देखील भावीकांची श्रध्दास्थानं आहेत.
हिंगोली जिल्हयाविषयी काही महत्वाची माहिती –
2011 च्या जनगणनेनुसार हिंगोली जिल्हयाची लोकसंख्या 1,177,345 एवढी आहे ज्यात शहराचा लोकसंख्या दर 15.60% (2011)
2011 सालापर्यंत हा जिल्हा सिंधुदुर्ग आणि गडचिरोली नंतर महाराष्ट्रातील 36 पैकी तीसरा सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे.
एकुण क्षेत्रफळ 4,526 कि.मी.
1000 पुरूषांमागे 942 स्त्रिया असा लिंग दर मोजला गेला.
साक्षरतेचे प्रमाण 78.17%
हिंगोली जिल्हयाची मातृभाषा मुख्यतः मराठी आहे.
12 ज्योर्तिलिंगामधले औंढा नागनाथ हे ज्योर्तिलिंग या जिल्हयात असल्याने वेगळा दर्जा या शहराला मिळाला आहे.
दसरा मोहोत्सवाकरता हिंगोली प्रसिध्द आहे. हा उत्सव जवळपास 160 वर्षांपासुन या शहरात साजरा होत असुन ही परंपरा आजही तितक्याच उत्साहाने साजरी होतांना दिसते.
ज्वारी आणि कापुस ही मुख्य पिकं या भागात घेतली जातात.
गोंधळ, शाहिरी, भारूड, पोतराज, कलगितुरा या लोककला आजही इथं जिवंत आहेत.