परभणी हा जिल्हा थोर संतांची भूमी म्हणून ओळखला जातो. संत नामदेवांचा जन्म यात जिल्ह्यातील नरशीचा असून संत जनाबाई ही गंगाखेडची आहे. महानुभाव कवी भास्करभट्ट हे बोरीचे आहे. जिल्ह्यातील औंढा नागनाथाचे ज्योतिर्लिंग व जिंतूरचे जैनमंदिर प्रसिद्ध आहेत. प्राचीन काळी परभणी शहर हे प्रभावतीनगरी म्हणून ओळखले जात असे. तर चला मग पाहूया परभणी या जिल्ह्याविषयी सविस्तर माहिती.
: परभणी जिल्ह्याचे क्षेत्रफळ :
परभणी जिल्ह्याचे क्षेत्रफळ 12,414 चौ. किमी एवढे असून याच्या उत्तरेला बुलढाणा व अकोला, ईशान्येला यवतमाळ, पूर्वेला नांदेड, दक्षिणेला उस्मानाबाद, नैर्ऋत्येला बीड व पश्चिमेला औरंगाबाद हे जिल्हे असून, ईशान्य सीमेवर पैनगंगा 160.93 किमी. व नैर्ऋत्य सीमेवर गोदावरी 64.37 किमी. या नद्या वाहतात.
: परभणी जिल्ह्यातील तालुके :
परभणी हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असून या जिल्ह्यात 9 तालुके आहेत.
1)परभणी 2) गंगाखेड 3) सोनपेठ 4) पाथरी 5) मानवत 6) पालम 7) सेलु 8) जिंतुर 9) पुर्णा.
: हवामान :
परभणी या जिल्ह्याचे हवामान उष्ण, कोरडे व विषम आहे. मे महिन्यात दिवसाचे तपमान 40° से. वर जाते, तर रात्री ते 25° से. च्या खाली येते. हिवाळ्यातील तपमान दिवसा 30°से., तर रात्री 15° से. इतके असते. उन्हाळ्यात तपमान कधीकधी 45° से. इतके वाढते, तर हिवाळ्यात रात्री 10° से. इतके खाली येते.
पाऊस जून ते सप्टेंबर या काळात पडतो. ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात थोडासा पाऊस मिळतो. पर्जन्यमान सामान्यतः 82.66 सेंमी. असून भूरचनेप्रमाणे त्यात फरक पडतो. जिंतूर, हिंगोली, कळमनुरी या तालुक्यांत पर्जन्यमान 110 सेंमी. पेक्षा अधिक असते, तर बालाघाटच्या पर्जन्यछायेत येणाऱ्या खोऱ्यातील तालुक्यांत ते 75-80 सेंमी. च्या आसपास असते.
परभणी जिल्ह्याचा इतिहास :
परभणी जिल्ह्याला प्राचीन इतिहास लाभलेला आहे. 1596 ते 1724 पर्यंत, जिल्ह्याच्या सध्याच्या क्षेत्राचा मोठा भाग मुघल साम्राज्याच्या बेरार डॉनच्या पाथरी आणि वाशिम सरकारमध्ये विभागला गेला होता. 1724 मध्ये साखरखेडाच्या लढाईनंतर ते निजामाच्या अधिपत्याखाली गेले. 1956 मध्ये राज्यांच्या पुनर्रचनेनंतर मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांसह परभणी हे मुंबई राज्याचा भाग बनले.
1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा ते राज्याचा एक भाग बनले. मराठवाड्यात नागरी हक्क क्रांती घडवून आणणाऱ्या नामांतर चळवळीदरम्यान परभणी जिल्हा आणि तेथील गावांना सांस्कृतिक वैराचा सामना करावा लागला.
वनक्षेत्र, वनस्पती व प्राणी :
या जिल्ह्यात वनस्पतींच्या वाढीसाठी लागणारा पाण्याचा पुरवठा अत्यंत कमी असल्यामुळे जंगल क्षेत्र खूपच कमी आहे. एकूण क्षेत्राच्या केवळ 3% क्षेत्र जंगलाखाली असून त्यातही पानझडी आणि काटेरी झाडे-झुडपे सापडतात. जंगलक्षेत्र डोंगराळ भागात आढळते. नद्यांच्या खोऱ्यांतील जमीन शेतीखाली आणण्याच्या दृष्टीने तेथे जंगलतोड झालेली आहे. जंगलांत साग, सालई, पळस, खैर, बाभूळ, बोर यांसारखी झाडे आढळतात.
वनस्पती व जंगल कमी असल्यामुळे जंगली प्राणी व पक्षांची देखील संख्या खूपच कमी आहे. येथील जंगलात बिबळ्या, कोल्हा, तरस, लांडगा, रानडुक्कर, सांबर, हरिण इ. प्राणी अजूनही आढळतात. परंतु त्यांच्या संख्येत पुष्कळच घट होत आहे. वन्य प्राणी शिकार प्रतिबंधक कायद्यामुळे या परिस्थितीत सुधारणा होत आहे.
नैसर्गिक जलाशय कमी असल्यामुळे जिल्ह्यात पक्षी फारच कमी आहेत. कबूतर, मोर, कवडे, सुतार, पाणकावळा, पाणबदके इ. पक्षी जलाशयांच्या आसपास आढळतात. जंगलांपासून मुख्यतः जळाऊ लाकूड, तेंडूची पाने व रोशा गवत मिळते.
शेती व्यवसाय :
परभणी या जिल्ह्यात मुख्य व्यवसाय शेती असून बरेच लोक उद्योगधंद्यांवर आपले जीवन निर्माण करतात. येथील ज्वारी हे येथील मुख्य पीक असून बाजरी, गहू व भात ही पिकेही थोड्या प्रमाणात घेतली जातात. तूर, हरभरा यांसारखी द्विदल धान्येही पिकतात.
नगदी पिकांमध्ये ऊस, कापूस व भुईमूग ही महत्त्वाची पिके होतात. अन्न पिकांखालील जमिनीचे प्रमाण 67.3% आहे. मात्र जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध असलेल्या भागांत नगदी पिकांखालील जमीन वाढत असून, त्यामानाने अन्नपिकांखालील जमीन घटत आहे.
उद्योग धंदे :
सरकी काढणे, गासड्या बांधणे, निरनिराळे अन्नपदार्थ बनविणे हे येथील महत्त्वाचे उद्योग होत. लाकूडकाम, मोटार व सायकल दुरुस्ती यांसारखे अनेक छोटे उद्योगधंदेही जिल्ह्यात आढळतात. पूर्णा नदीवरील येलदरी व सिद्धेश्वर या धरणांमुळे शेतीविकासास व वीजनिर्मितीस चालना मिळाली आहे.
वाहतूक :
राष्ट्रीय महामार्ग 61 जुनी क्रमांक एनएच 222 जो तेलंगणा व महाराष्ट्र या राज्यांना जोडतो, या गावातून जातो आणि यामुळे मुंबई, नांदेडला जोडले जाते. एनएच 1 कल्याण मधील राष्ट्रीय महामार्गवर मार्ग दाखवित आहे. हे शहर मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक आणि कोल्हापूर यासारख्या महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांशी जोडले गेले आहे.
हे नवी दिल्ली, बेंगलोर, हैदराबाद, चेन्नई, अजमेर, भोपाळ, अमृतसर, अलाहाबाद, रामेश्वरम, तिरुपती आणि विशाखापट्टनम सारख्या इतर भारतीय शहरांशीही जोडले गेले आहे. परभणीचे केंद्रीय बसस्थानक परभणीला आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश यासारख्या भारतातील इतर राज्यांशी जोडते.
समाज जीवन :
जिल्ह्यातील रहिवाशांमध्ये 3% आदिवासी असून धोतर, सदरा, डोक्याला टोपी किंवा रुमाल हा पुरुषाचा मुख्य पोषाख आहे. स्त्रिया लुगडे आणि चोळी वापरतात. मात्र जमात व आर्थिक परिस्थित्यनुसार त्यात फरक पडतो. शहरांतील लोकांच्या पोषाखात आधुनिकता वाटते. स्त्रिया लुगडे आणि चोळी वापरतात.
ते मुख्यतः कळमनुरी, हिंगोली, जिंतूर आणि वसमत या डोंगराळ तालुक्यांत आढळतात. खेड्यांतील घरे पर्यावरणात आढळणाऱ्या वस्तूंचा उपयोग करूनच बांधलेली असतात. पाऊस बेताचा असल्याने घरे धाब्याचीच असतात. साधारण आर्थिक परिस्थिती बरी असणाऱ्या शेतकऱ्यांची घरे दगड, विटा यांची असतात.
सामान्य शेतकऱ्यांच्या घरांचे धाबे लाकडी खांबांवर आधारलेले असून, भिंती मातीच्या असतात. गरीब लोकांची घरे झाडांच्या फांद्या, पाने आणि गवत यांनीच बांधलेली असतात. लोकांचे मुख्य अन्न म्हणजे ज्वारीची भाकरी, वरण किंवा आमटी, भाजी मांस आणि कधीकधी भात हे आहे.
भारताच्या 2011 च्या जनगणनेच्या वेळी, जिल्ह्याची 78.35% लोकसंख्या मराठी, 11.97% उर्दू, 4.99% हिंदी आणि 2.96% लंबाडी भाषा बोलते. जिल्ह्यात सर्वाधिक वापरल्या जाणार्या भाषांमध्ये मराठी, डेक्कन, उर्दू, आंध्र, हिंदी, इंग्रजी आणि इतरांचा समावेश होतो.