जिकडे तिकडे पाणीच पाणी; मुंबईसह महाराष्ट्राला मुसळधार पावसाने झोडपलं, वाहतूक विस्कळीत
गेल्या आठवड्यात काहीसा शांत झालेला पाऊस आता पुन्हा एकदा मुसळधार बरसू लागलाय. कालपासून मुंबईसह संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावलीये. तसेच पुढील ५ दिवस राज्यात अनेक ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आहवामान विभाने ४ जिल्ह्यांना रेड अलर्ट आणि ९ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केलालाय.मुसळधार पावसामुळे राज्यात सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचं दिसत आहे. अनेक ठिकाणी नद्या नाले ओसंडून वाहत असून पुरस्थिती निर्माण झालीये. रस्त्यावर सखल भागात पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय.
मुंबईच्या लोकल सेवेवर देखील पावसाचा परिणाम झालाय. पावसामुळे लोकल सेवा धिम्या रेड अलर्ट असलेल्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. ज्या ठिकाणी रेड अलर्ट आहे तेथे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. यासह नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पावसाने धरण पाणलोट क्षेत्रात वाढ झालीये.
चांदोली धरण 85 टक्के भरलं
सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण क्षेत्रामध्ये पावसाची संततधार कायम असून गेल्या 24 तासांमध्ये या ठिकाणी पुन्हा अतिवृष्टी झाली आहे. 55 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद धरण क्षेत्रामध्ये झाली आहे. संततधार पडणाऱ्या पावसामुळे चांदोली धरण आता जवळपास 85% इतकं भरले आहे आणि धरणामध्ये पाण्याची आवक ही कायम आहे.गतीने सुरू 34.40 टीएमसी इतकी साठवण क्षमता असणाऱ्या धरणामध्ये आता 29 टीएमसी इतका पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे धरण प्रशासनाकडून धरणातून वारणा नदी पात्रामध्ये विसर्ग कालपासून सुरू करण्यात आला होता.
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात अतिवृष्टी सुरू आहे. गेल्या 24 तासात तब्बल 144 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आलीये. रत्नागिरी तालुक्यात तब्बल 177 लांजा तालुक्यात 169 संगमेश्वर 157 मंडणगड तर गुहागर 143 मिलीमीटर पाऊसाची नोंद झालीये. जूनपासून आतापर्यंत 1980 मिलिमीटर सरासरी पाऊस जिल्ह्यात बरसला आहे. गतवर्षाची पावसाची सरासरी देखील ओलांडली गेलीये
.