ताज्या बातम्या

वि.वा शिरवाडकर स्मारक माहिती


ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज ऊर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांच्या स्मारकात अतिरिक्त बांधकाम करून तेथे ‘मराठी भाषा अभ्यास केंद्र’ तयार केले जाणार आहे. आमदार सत्यजीत तांबे यांच्या पुढाकारातून यासाठी 50 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर अवघ्या एका महिन्यातच तांबे यांनी नाशिक मतदारसंघात विविध विकासकामांचा सपाटा लावला आहे.

नाशिक शहराच्या टिळकवाडी परिसरातील तरंग तलावाशेजारील कुसुमाग्रजांच्या स्मारकात हे मराठी भाषा अभ्यास केंद्र तयारकरण्यात येणार आहे. याठिकाणी कुसुमाग्रजांचे निवासस्थान असून त्यांच्या हयातीत याच परिसरात वाचनालयदेखील उभारण्यात आले होते. नाशिक मनपाच्या वतीने कुसुमाग्रजांच्या घराचे येथे जतन करण्यात आले आहे. याठिकाणी अतिरिक्त बांधकाम करून अद्यायावत असे ‘मराठी भाषा अभ्यास केंद्र’ तयार करण्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे.

मराठी साहित्यामध्ये काही साहित्यकारांची नावे कायम नवीन व आताची वाटतात. त्यापैकीच एक आधुनिक युगाचे कवी अशी ओळख असलेले कवी म्हणजे कवी ‘कुसुमाग्रज’ मराठी साहित्य आणि त्याचा अभ्यास करणाऱ्यांना आजही या मराठी साहित्यिकाविषयीची अधिक खोलवर माहिती घेण्याची कायम उत्सुकता असते. मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, समीक्षक, नाटककार आणि कथाकार अशी त्यांची ओळख आहे.

मराठी भाषा आणि मराठी साहित्य यांना हजारो वर्षांचा इतिहास आहे. यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जगभरातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीचा समावेश आहे. मराठी साहित्याची मोठी व्याप्ती आहे.

अनेक दिग्गज कवी, लेखक यांनी मराठी भाषेमध्ये उत्तमोत्तम कलाकृतींची निर्मिती केली आहे. असेच एक ज्येष्ठ साहित्यिक म्हणजे कुसुमाग्रज ऊर्फ विष्णू वामन शिरवाडकर. मराठी ही राजभाषा, ज्ञानभाषा व्हावी यांसाठी केलेल्या संघर्षामध्ये कुसुमाग्रज नेहमीच अग्रेसर होते. त्यांनी केलेल्या संघर्षांला आणि त्यांच्या दर्जेदार कलाकृतींना अभिवादन करण्यासाठी आणि मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या स्मारकस्थळी ‘मराठी भाषा अभ्यास केंद्र’ तयार केले जाणार असल्याचे आमदार सत्यजीत तांबे यांनी सांगितले.

यामध्ये नाशिकच्या कुसुमाग्रजांच्या स्मारकात मराठी भाषा अभ्यास केंद्र तयार करण्यासाठी सत्यजीत तांबेंच्या प्रयत्नातून 50 लाखांचा निधी देण्यात आला आहे. तसेच, नाशिक महानगरपालिकेची शाळा अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज करून तिची मॉडेल स्कूल तयार करण्याकरिता सत्यजीत तांबेंच्या प्रयत्नातून ५० लाखांचा निधी आणि मालेगाव मधील पाच उर्दू शाळांच्या विकासासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नातून 50 लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *