‘स्वराज्य संकल्पक शहाजी राजे यांच्या स्मारकाची निगराणी व विकासासाठी स्मारक समिती या नावेच ट्रस्ट स्थापन करावा,’ अशी सूचना नागपूर येथील मुधोजी राजे भोसले यांनी केली. पाठपुरावा करूनही शासनातर्फे जयंती साजरी केली जात नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त करून मोठ्या प्रमाणावर जयंती साजरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यासाठी खर्चाचा वाटा नागपूर संस्थानतर्फे उचलण्याची तयारी त्यांनी दाखवली.‘स्वराज्य संकल्पक शहाजी राजे यांच्या स्मारकाची निगराणी व विकासासाठी स्मारक समिती या नावेच ट्रस्ट स्थापन करावा,’ अशी सूचना नागपूर येथील मुधोजी राजे भोसले यांनी केली. पाठपुरावा करूनही शासनातर्फे जयंती साजरी केली जात नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त करून मोठ्या प्रमाणावर जयंती साजरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यासाठी खर्चाचा वाटा नागपूर संस्थानतर्फे उचलण्याची तयारी त्यांनी दाखवली.शहाजी राजे भोसले यांची जयंती शनिवारी वेरूळे येथील स्मारकात साजरी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर होते. अप्पर विभागीय आयुक्त गोविंद बोडखे, छावा संघटनेचे अध्यक्ष किशोर चव्हाण, प्रदेशाध्यक्ष विलास पांगरकर, माजी सभापती भीमराव खंडागळे, पंचायत समिती सदस्य युवराज ठेंगडे, सरपंच साहेबसिंग गुमलाडू, उपसरपंच कोमल दगडफोडे, तहसीलदार डॉ. अरुण जऱ्हाड, तलाठी नामदेव कुसनुरे, छावा संघटक योगेश केवारे, तानाजी हस्सेकर, दीपक पाटील राजूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘स्मारक परिसरातील मालोजी राजे, विठोजी राजे व जानोजी राजे यांच्या समाधीकडे लक्ष द्यावे. विठोजी व मालोजीराजे यांनी खोदलेल्या तलावातील गाळ काढावा,’ आदी सूचना मुधोजी राजे भोसले यांनी केल्या. विभागीय आयुक्त डॉ. भापकर म्हणाले, वेरूळ हे हिंदवी स्वराज्य स्थापनेचे ठिकाण आहे. मुधोजी राजे भोसले यांनी शासन दरबारी मांडलेल्या निरीक्षणातून ऐतिहासिक संग्रहालय, स्लाइड शो, माहिती फलक, समाधींचे सुशोभीकरण, डागडुजी आदी कामे जलदगतीने केली जातील, असे आश्वासन डॉ. भापकर यांनी दिले.