पुणे. : राज्यात बहुतांशी जिल्ह्यांना गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगलेच झोडपले आहे. बंगालच्या उपसागरात सोमवारी कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. त्यामुळे वाऱ्याचा वेग वाढला असून, कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भाला २७ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.भारतीय हवामान खात्याच्या मुंबई प्रादेशिक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांना २७ जुलैपर्यंत मुसळधार ते अतिवृष्टीचा ‘ऑरेंज’ इशारा दिला आहे. राजस्थान, उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर, मध्य प्रदेश, गुजरात राज्यात जोरदार पाऊस पडत आहे, असं देखील हवामान खात्याने म्हटलं आहे.तसेच मुंबईतही मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच २४ जुलैपासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्याने २५ ते २७ जुलैपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, असंही हवामान खात्याने म्हटलं आहे.