आंध्र प्रदेशच्या कुर्नूलमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. एका व्यक्तीला दारू पिऊन बायकोचे चुंबन घेणे चांगलेच महागात पडले आहेत. संतापलेल्या पत्नीने असे काही केले की त्याला रूग्णालयात धाव घेण्याची वेळ आली.
हे प्रकरण कुर्नूल जिल्ह्यातील जोन्नागिरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. येथे एका महिलेने आपल्या पतीची जीभ चावल्याची घटना घडली आहे. दारु प्यायलेल्या नवऱ्याने चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. नवरा दारुच्या नशेत असल्याने तिने त्याला विरोध केला. मात्र त्यावरही तो शांत न बसता त्याने बळजबरी तिचे चुंबन घेत असल्याने संतापलेल्या पत्नीने त्याच्या जीभेचा जोरदार चावा घेतला. तिने इतक्या जोरात चावा घेतला की त्याची जीभ रक्तबंबाळ झाली. त्याला रूग्णालयात नेण्यात आले आहे.