सध्याचे सोयाबीनचे भाव पाहता शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. सोयाबीन हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीनच्या दरात मोठी वाढ झाली होती, तर हळूहळू या तेजीचा वेग थांबला आणि सध्या सोयाबीनचे भाव स्थिर आहेत.
यामुळे सोयाबीनचे भाव स्थिर झाल्यानंतर भावात आणखी वाढ होईल या आशेने शेतकर्यांनी सोयाबीन साठवून ठेवले. मात्र शेतकर्यांना अपेक्षेप्रमाणे भाव मिळत नसल्याचे आपल्याला दिसत आहे.
व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सोयाबीनचे भाव स्थिर राहण्याचे कारण म्हणजे सोयाबीनच्या मागणीमध्ये नरमाई आहे. सोयाबीनला मागणी पूर्वीसारखी नाही, त्यामुळे सोयाबीनच्या दरात घसरण झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान असे असले तरी शेतकऱ्यांनी आता सोयाबीन विकायला काढला आहे. दरम्यान आज सोयाबीनला किती भाव मिळाला याबद्दल जाणून घेऊयात.
शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर रोजचे बाजार भाव चेक करायचे असतील तर आजच Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करा यामध्ये तुम्हाला रोजचे बाजारभाव, हवामान अंदाज, सरकारी योजना, पशुंची खरेदी विक्री, जमीन मोजणी, त्याचबरोबर रोपवाटिकांची माहिती व अन्य कृषी विषयक माहिती मिळेल. तेही अगदी मोफत त्यामुळे लगेचच प्लेस्टोर वरून जाऊन आपले Hello Krushi हे ॲप डाऊनलोड करा
सोयाबीनला आज सर्वात जास्तीचा दर 4900 पर्यंत मिळाला आहे. जळगाव, माजलगाव, उदगीर, कारंजा, सोलापूर, हिंगोली, अकोला, यवतमाळ, मालेगाव, वाशिम, तासगाव या ठिकाणी सोयाबीनला 4900 रुपयांपर्यंत दर मिळाला आहे, तर उमरखेड या ठिकाणी सोयाबीनला पाच हजार रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर मिळाला आहे.