खो खो हा खेळ प्राचीन काळापासून खेळला जात आहे. या खेळाची सुरुवात भारतातील महाराष्ट्र या राज्यातून पकडण्याच्या खेळापासून झाली. सर्वात आधी १९ व्या शतकामध्ये खो खो हा खेळ महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये खेळला जाऊ लागला. १९१४ मध्ये पूणे येथील जीमखान्यामध्ये खो खो खेळाचे नियम बनविण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. १९२४ मध्ये बडोदा येथील जीमखान्याने खो खो चे नियम प्रकाशित केले. आणि अशा प्रकारे खो खो हा खेळ खेळायला सुरुवात झाली. यानंतर १९६० च्या दरम्यान आंध्रप्रदेश मधील विजयवाडा येथे भारत सरकारने खो खो खेळाची पहिली राष्ट्रीय स्पर्धा पार पाडली.
खोखो हा दोन संघांमध्ये खेळला जाणारा खेळ आहे. हा खेळ खेळण्यासाठी एका संघामध्ये १२ खेळाडू असणे आवश्यक असते. १२ खेळाडूंमधील ९ खेळाडू खो खो खेळतात आणि तीन खेळाडू हे राखीव असतात. जेव्हा मैदानावर कोणत्या खेळाडू ला दूखापत होते किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे खेळाडू खो खो खेळू शकत नसेल तर त्या वेळी राखीव खेळाडूंना त्यांच्या जागी खो खो खेळण्याची संधी दिली जाते. खो खो हा खेळ खुप सोपा आहे पण हा खेळ वेगाने खेळला जातो. हा खेळ खेळण्यासाठी खेळाडूंच्या अंगात चपळता असणे आवश्यक असते.